ICC Cricket : क्रिकेट विश्व हादरलं, मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

match fixing icc action players on corruption in cricket charges before world cup
match fixing icc action players on corruption in cricket charges before world cup
social share
google news

Match Fixing Cricket  : जगभरातील क्रिकेटप्रेमी आता मोठ्या स्पर्धेची वाट बघत आहेत. त्यातच आता एक दिवसीय विश्वचषकाकडून (world cup) चाहत्यांच्या मोठ मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र त्याआधीच क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली आहे. कारणही तसच आहे. आयसीसीने (ICC) एका लीगमध्ये मॅच फिक्सिंग (Match fixing) झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांवर आता बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीकडून आता एकूण 8 जणांवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्व हादरलं आहे. (match fixing icc action players on corruption in cricket charges before world cup)

ADVERTISEMENT

खेळाडू आणि टीम मालकही

बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू नासिर हुसैनसह त्यामध्ये एकूण 8 जणांच्या नावाचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि टीमच्या मालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीसीने नासिर हुसेनवर कलम 2.4.3, कलम 2.4.4 आणि कलम 2.4.6 लावण्यात आले आहे. या अंतर्गत आरोप करण्यात आले असून क्रिकेट स्पर्धा खेळताना काही भेटवस्तू मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच याबाबतची माहिती लपवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब

ईसीबीला सहकार्य नाही

नासिर हुसेनने बांगलादेशकडून 19 कसोटी, 65 एकदिवसीय सामने आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र 2017 पासून त्याने कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळ केला नाही. मात्र तो बांगलादेश प्रीमियर लीग आणि इतर काही लीगमध्ये सक्रिय असल्याचे मात्र सांगण्यात आले आहे.अबुधाबी टी-10 लीगचे दोन टीम मालक कृष्ण कुमार चौधरी आणि पराग संघवी यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या दोघांवर ईसीबीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संघाच्या हिटिंग कोच, टीम मॅनेजर, सहाय्यक प्रशिक्षक आणि इतर दोन देशांतर्गत खेळाडूंवरही याबाबतचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Michchami Dukkadam : PM मोदींनी नव्या संसदेत वापरलेल्या ‘मिच्छामी दुक्कडम’ शब्दाचा अर्थ काय?

स्पष्टीकरण द्या

आयसीसीकडून ज्यांच्या आरोप केले आहेत, त्या सर्वांना निलंबित केले असून त्यांना आता स्पष्टीकरण देण्यासाठी काही दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. जगभरात खेळल्या जाणार्‍या अनेक प्रकारच्या क्रिकेटवर आयसीसीकडून नजर ठेवण्यात येते. तर आयसीसीच्या ईसीबीकडूनही वेळोवेळी खेळाडू आणि क्रिकेट मंडळांच्या सहकार्याने वेगवेगळ्या प्रकारची चौकशी करत असते आणि त्यातूनच हे सर्व उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT