MCA Election 2022 : अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलच्या अमोल काळेंची बाजी; संदीप पाटील पराभूत
मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. यात अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर संदीप पाटील यांना १५८ मत मिळली. यामुळे पुन्हा […]
ADVERTISEMENT
मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. यात अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर संदीप पाटील यांना १५८ मत मिळली. यामुळे पुन्हा एकदा राजकारणी क्रिकेटरवर भारी पडल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT
(इतर निकाल अपडेट होत आहेत)
कोण आहेत अमोल काळे?
अमोल काळे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमोल काळे आणि देवेंद्र फडणवीस हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. नागपुरातील अभ्यंकर नगर परिसरात अमोल काळे यांचे दोन अलिशान बंगले आहेत. अमोल काळे यांचा कन्स्ट्रक्शन आणि आयटी क्षेत्रात मोठा व्यवसाय असल्याची माहिती आहे.
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अमोल काळे यांची एमसीएच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता ते एमसीएचे अध्यक्ष झाले आहेत. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरुन अमोल काळे यांची तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या समितीवर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून २०१९ साली नेमणूक करण्यात आली होती.
कोण कोण होते मैदानात?
एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशिष शेलार गटाकडून अमोल काळे हे उमेदवार होते, तर मुंबई क्रिकेट गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. संदीप पाटील यांच्यासमोर पवार-शेलार पॅनलचं आव्हान असल्याने अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली.
ADVERTISEMENT
अध्यक्षपदासोबतच कार्यकारी मंडळाच्या जागांसाठीही थेट लढत झाली. सचिवपदासाठी बहुजन विकास आघाडीच्या पंकज ठाकूरांचे जावई अजिंक्य नाईक विरुद्ध ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे पुत्र नील सावंत विरुद्ध मयांक खांडवाला अशी तिरंगी लढत झाली. सहसचिव या पदासाठी दीपक पाटील यांच्याविरुद्ध कुणीही उमेदवारी अर्ज केलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार झाली. एमसीए’च्या कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर, संजीव खानोलकर आणि अरमान मल्लिक यांनी उमेदवारी दाखल केली होती.
ADVERTISEMENT
याशिवाय या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हे पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी मैदानात होते. या तिघांच्या उमेदवारीनं कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी तब्बल २३ जणांमधली शर्यत चुरशीची झाली होती. सोबतच एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT