IPL 2022 : दिग्गज खेळाडूंची Mega Auction मधून माघार, जाणून घ्या कोण आहेत ते प्लेअर्स?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या आगामी हंगामासाठीच्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे. खेळाडूंना आपलं नाव नोंदवण्यासाठी २० जानेवारी ही शेवटची तारीख देण्यात आली होती. यानुसार १ हजार २१४ खेळाडूंनी या मेगा ऑक्शनसाठी अआपलं नाव नोंदवलं आहे. परंतू या मेगा ऑक्शनआधीच काही दिग्गज खेळाडूंनी आगामी हंगामातून माघार घेतली आहे.

ADVERTISEMENT

ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार; ख्रिस गेल, मिचेल स्टार्क, बेन स्टोक्स या खेळाडूंनी लिलावाकरता आपलं नाव नोंदवलं नाहीये. याचसोबत जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन या अनुभवी खेळाडूंनीही माघार घेण्याचं ठरवलंय.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, भारताचा अनुभवी स्पिनर रविचंद्रन आश्विन, ड्वेन ब्राव्हो, मिचेल मार्श, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना या सर्व खेळाडूंनी आपली बेस प्राईज २ कोटी ठेवली आहे. याव्यतिरीक्त शाकीब अल हसन, ट्रेंट बोल्ट, स्टिव्ह स्मिथ, क्विंटन डी-कॉक, कगिसो रबाडा यांची बेस प्राईज २ कोटी ठरवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या शाहरुख खानला यंदा लिलावात चांगली मागणी असू शकते. त्यामुळे २० लाखांच्या बेस प्राईजवरुन संघमालक त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकतात. याव्यतिरीक्त अमित मिश्रा, इशांत शर्मा, अरॉन फिंच, ओएन मॉर्गन, ड्वाइड मलान, टीम साऊदी, जेम्स निषम यांची बेस प्राईज १.५ कोटी ठरवण्यात आली आहे.

IPL 2022 : Mega Auction साठी १ हजार २१४ खेळाडूंनी नोंदवलं नाव

ADVERTISEMENT

अजिंक्य रहाणे, कुलदीप यादव, टी. नटराजन, हसरंगा, एडन मार्क्रम, तबरेज शम्सी या खेळाडूंची बेस प्राईज १ कोटी ठरवण्यात आली आहे. दरम्यान आयपीएलच्या लिलावासाठी नोंद केलेल्या १ हजार २१४ खेळाडूंपैकी ८९६ खेळाडू हे भारतीय तर ३१८ खेळाडू हे परदेशी आहेत. आगामी हंगामात आयपीएलचा होणारा लिलाव हा १० संघामध्ये पार पडणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. या खेळाडूंपैकी २७० खेळाडू capped, ९०३ खेळाडू uncapped तर ४१ associated खेळाडू आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT