IPL 2022 : Mega Auction साठी १ हजार २१४ खेळाडूंनी नोंदवलं नाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवण्यासाठीची अंतिम तारीख संपली आहे. बीसीसीआयने २० जानेवारीपर्यंत खेळाडूंना आपलं नाव पाठवण्याची विनंती केली होती. ही तारीख उलटून गेल्यानंतर बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, १ हजार २१४ खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे.

यापैकी ८९६ खेळाडू हे भारतीय तर ३१८ खेळाडू हे परदेशी आहेत. आगामी हंगामात आयपीएलचा होणारा लिलाव हा १० संघामध्ये पार पडणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. या खेळाडूंपैकी २७० खेळाडू capped, ९०३ खेळाडू uncapped तर ४१ associated खेळाडू आहेत.

आयपीएलसाठी नाव नोंदवण्यात आलेल्या परदेशी खेळाडूंमध्ये सर्व महत्वाच्या देशांचा समावेश असून सर्वाधिक खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत (५९ खेळाडू). भुतानच्या एका खेळाडूने आयपीएलसाठी आपलं नाव नोंदवलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्येक टीम ओनर्सला आपल्या संघात २५ खेळाडू ठेवायचे असल्यास २१७ खेळाडूंची फायनल ऑक्शनसाठी निवड केली जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. आतापर्यंत ३३ खेळाडूंना १० संघांनी आपल्या टीममध्ये जागा दिली आहे. त्यामुळे मेगा ऑक्शनमध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघात जातो आणि कोणाला सर्वाधिक बोली लागतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT