मुंबई पोलिसांनी कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघातील (Team India) खेळाडूंच्या कामगिरीवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यात एकाने विराट कोहलीच्या (Virat kohli) मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. बलात्काराची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने हैदराबादमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. […]
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघातील (Team India) खेळाडूंच्या कामगिरीवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यात एकाने विराट कोहलीच्या (Virat kohli) मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. बलात्काराची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने हैदराबादमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai Police Cyber Cell arrests a man for giving online rape threats to daughter of an Indian cricketer)
ADVERTISEMENT
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उतरला होता. मात्र, भारताला सुरूवातीच्या महत्त्वाच्या सामन्यात समाधानकारक कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्युझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचं विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर संघातील खेळाडूंना ट्रोल करण्यात आलं. इतकंच नाही, तर एकाने विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.
याची गंभीर दखल घेत दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, या प्रकरणात मुंबई सायबर सेल कारवाई केली आहे. मुंबई सायबर सेलच्या पथकाने बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला हैदराबादेतून अटक केली आहे.
हे वाचलं का?
ट्रोलिंगची हद्द झाली! कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी
रामनागेश अलीबथिनी असं या आरोपीचं नाव आहे. त्याचं वय 23 वर्ष असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला मुंबईत आणण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Police Cyber Cell arrests a man from Hyderabad for giving online rape threats to daughter of an Indian cricketer following team's loss against Pakistan in T20 World Cup. The man, identified as one 23-year-old Ramnagesh Alibathini, is being brought to Mumbai: Mumbai Police
— ANI (@ANI) November 10, 2021
T20 WC : मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांवर विराट कोहली भडकला!
ADVERTISEMENT
23 वर्षीय रामनागेश अलीबथिनी याने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केल्यानंतर ऑनलाईन धमकी दिली होती. विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी त्याने दिली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT