Kaun Pravin Tambe?: ‘मुलं मोठी होईपर्यंत माझा संघर्ष सुरु होता,आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं’

मुंबई तक

ज्या वयात क्रिकेटपटू किंवा कोणतेही खेळाडू हे सर्वसाधारणपणे निवृत्तीचा विचार करतात त्यावेळी एक खेळाडू आयपीएलच्या मैदानात उतरला आणि फार कमी कालावधीत त्याने संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. तुमच्यात जिद्द आणि मेहनत घ्यायची ताकद असेल तर Age is just a number हे वाक्य मुंबईच्या प्रवीण तांबेने तंतोतंत खरं करुन दाखवलं. मुंबईच्या मध्यमवर्गीय घरांत वाढलेला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

ज्या वयात क्रिकेटपटू किंवा कोणतेही खेळाडू हे सर्वसाधारणपणे निवृत्तीचा विचार करतात त्यावेळी एक खेळाडू आयपीएलच्या मैदानात उतरला आणि फार कमी कालावधीत त्याने संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. तुमच्यात जिद्द आणि मेहनत घ्यायची ताकद असेल तर Age is just a number हे वाक्य मुंबईच्या प्रवीण तांबेने तंतोतंत खरं करुन दाखवलं. मुंबईच्या मध्यमवर्गीय घरांत वाढलेला आणि आयुष्यभर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बाळगलेल्या प्रवीण तांबेच्या आयुष्यावरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कौन प्रवीण तांबे? हा सिनेमा आजपासून हॉटस्टार या App वर आला आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने यात प्रवीण तांबेची भूमिका साकारली असून या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या निमीत्ताने मुंबई तक ने क्रिकेटपटू प्रवीण तांबेशी संवाद साधून त्याच्या या चित्रपटाविषयीच्या भावना आणि आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेतलं.

१) तुमच्यावर चित्रपट काढायचा आहे हे जेव्हा समजलं तेव्हा तुमची भावना काय होती आणि या चित्रपटातून प्रेक्षकांना काय पहायला मिळेल?

– मला खरंच खूप आनंद झाला. या चित्रपटातून इतरांना काय मिळेल असं विचारलं तर त्याचं उत्तर असेल जिद्द. ही कथा माझी एकट्याची नाही, मुंबईत माझ्यासारखे असे अनेक खेळाडू आहेत की ते आजही स्थानिक पातळीवर टेनिस आणि रबरी बॉलवरच्या स्पर्धा खेळतात. यातल्या अनेक खेळाडूंकडे प्रचंड टॅलेंट आहे. मुंबईतल्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येकाला मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही. माझ्या चित्रपटातही लोकांना हेच पहायला मिळेल. अनेकदा संधी न मिळाल्यामुळे स्थानिक पातळीवरचे खेळाडू निराश होतात, खेळणं सोडून देतात…पण हा चित्रपट तुम्हाला खचून न जाता जिद्द मनात ठेवून अधिक मेहनत करण्यासाठीचं बळ देईल.

हे वाचलं का?