Babar Azam: हनी ट्रॅपच्या कथित प्रकरणानंतर बाबर आझमचा पहिलं ट्विट
Babar Azam Honey Trap: कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सतत अडचणीत येत आहे. मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर आता त्याच्या कर्णधारपदावरही बोटे उचलली जात आहेत. आता त्याचे काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर लीक झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र याच दरम्यान बाबर यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. सोशल […]
ADVERTISEMENT

Babar Azam Honey Trap: कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सतत अडचणीत येत आहे. मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर आता त्याच्या कर्णधारपदावरही बोटे उचलली जात आहेत. आता त्याचे काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर लीक झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र याच दरम्यान बाबर यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.
सोशल मीडियावर काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बाबर आझम दिसत असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर काही युजर्सनी बाबरला प्रचंड ट्रोल केले, तर काही चाहत्यांनी बाबरचे समर्थनही केले.
ट्विटरवर @niiravmodi अकाऊंटवरून सर्वप्रथम एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आला. असा दावा करण्यात आला आहे की व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती बाबर आझम असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला होता, जो eish.arajput1 अकाऊंटने शेअर केल्याचे दिसते. बाबर यांनी याप्रकरणी अद्याप काहीही सांगितलेले नाही.
पण आता याच दरम्यान बाबरने त्याच्या कूल लूकचा एक फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबरने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत बाबर नदीच्या काठावर बसलेला दिसत आहे. तसेच पोस्टमध्ये लिहिले की, ‘आनंदी होण्यासाठी फार काही लागत नाही.’ यावर प्रतिक्रिया देताना काही युजर्सनी बाबर बरा होण्याची आशाही व्यक्त केली.