Viral Video : पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या ‘त्या’ कृत्यावर यूजर्स प्रचंड संतापले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shahid Afridi Insulted Indian Flag : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो लीजेंडस क्रिकेट लीग (legends league cricket) खेळत आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात शाहिद आफ्रिदीने भारताच्या तिरंग्याचा अपमान केल्याची घटना समोर आली आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय फॅन्स चांगलेच भडकले आहेत.(pakistan ex captain shahid afridi insulted indian flag bye keeping autograth in thigh video viral)

ADVERTISEMENT

शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सध्या लीजेंडस क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात शाहिद आफ्रिदीकडे एका भारतीय फॅनने ऑटोग्राफ मागितला होता. हा ऑटोग्राफ देताना त्याने भारतीय तिरंग्यावर (Indian Flag) साईन केली होती. या संदर्भातला व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर पाकिस्तानचे फॅन्स एकिकडे शाहिद आफ्रीदीचे कौतूक करत असताना दुसरीकडे भारतीय फॅन्स चांगलेच भडकले आहेत. भारतीय फॅन्सनी आफ्रीदीवर टीका करायला सुरूवात केली आहे.

Ind vs Aus: भारताचा लाजिरवाणा पराभव, रोहित शर्मा फलंदाजांवर संतापला

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडिओत काय?

एक भारतीय सिक्यूरीटी गार्ड शाहिद आफ्रीदीकडून (Shahid Afridi) ऑटोग्राफ मागतो. यावेळी ऑटोग्राफ देताना आफ्रीदी तिरंग्याला आपल्या मांडीवर ठेवून त्याला ऑटोग्राफ देतो. आफ्रीदीचे हे वागणं भारतीय फॅन्सला पचलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. काही फॅन्सनी तर ऑटोग्राफ मागणाऱ्या व्यक्तीवरही टीका केली आहे. नॅशनल फ्लॅग कोडनुसार भारतीय तिंरग्यावर काहीच लिहलं गेले नाही पाहिजे.जर कोणी फ्लॅगवर लिहतं असेल, तर तो तिरंग्याचा अपमान मानला जातो.

ADVERTISEMENT

Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय

ADVERTISEMENT

भारतीय फॅन्स संतापले

एका पाकिस्तानी फॅनने हा व्हिडिओ शेअर करत शाहिद आफ्रीदीचे हृदय किती मोठे आहे, असे कौतूक केले होते. याच व्हिडिओला रिट्वीट करत एका भारतीय फॅनने काही मोठं हृदय नाही, हा भारतीय तिरंग्याचा अपमान (Indian Flag) असल्याची टीका केली होती. तर दुसऱ्या युझरने भारतीय तिरंग्याचा अपमान करू नये, असा सल्ला दिला. तर तिसऱ्या युझरने भारतीय फॅनवरच टीका केली असून त्याला निलंबित केले पाहिजे असे मत मांडले आहे. तसेच आणखीण एका युझरने मांडीवर तिरंग्याला ठेवून ऑटोग्राफ देण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

India Today Conclave : ‘वनडे क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी…’,सचिन तेंडुलकरने सांगितला प्लान

शाहिद आफ्रीदी (Shahid Afridi) काश्मीर मुद्यावर जेव्हाही बोलतो, तेव्हा तो भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम गंभीर यांच्यावर अनेकदा त्यांनी वादग्रस्त टीका केली आहे. यामुळे आफ्रीदीला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले होते. दरम्यान सध्या शाहिद आफ्रिदी भारताचे रिटायर्ड प्लेयर्स यांच्यासोबत लीजेंडस लीग क्रिकेट खेळत आहेत. या लीगमध्ये ते एशिया लायन्स संघाचा कर्णधार आहे. आफ्रीदीची टीम फायनलमध्ये पोहोचली असून त्यांचा सामना वर्ल्ड जायंटशी होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT