6,6,6,6,6,6… पंजाब किंग्जच्या खेळाडूंचं मैदानावर ‘वादळ’, ठोकलं तुफानी शतक

मुंबई तक

ADVERTISEMENT

punjab kings sikandar raza hits century in world cup qualifier match against oman vs zimbabwe
punjab kings sikandar raza hits century in world cup qualifier match against oman vs zimbabwe
social share
google news

वनडे वर्ल्ड कप 2023 (world cup 2023) चा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये रंगणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये 10 संघ खेळणार आहेत. या 10 मधील 8 संघ आधीच क्वालिफाय झाले आहेत. तर इतर 2 संघासाठी क्वालिफाय सामने झिम्बाब्वेमध्ये (Zimbabwe) सुरु आहेत. याच क्वालिफाय सामन्यात आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळणाऱ्या सिकंदर रझाने धावांचा पाऊस पाडला आहे. सिंकदर रझाने या सामन्यात 67 बॉलमध्ये 110 धावा ठोकल्या आहेत. सिकंदर रझाच्या (sikandar raza) आतिषबाजी खेळीमुळे त्यांनी ओमानचा पराभव केला आहे. आता सिकंदर रझाच्या या खेळीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. (punjab kings sikandar raza hits century in world cup qualifier match against oman vs zimbabwe)

आयपीएल 2023 मध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (sikandar raza) पंजाब किग्सकडून (Punjab Kings) खेळला होता.मात्र त्याला आयपीएलमध्ये फारशी अशी कामगिरी करता आली नाही. आयपीएलमध्ये त्याने 7 सामन्यात 139 धावाच केल्या होत्या.आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतर सिकंदर रझाने वनडे वर्ल्डकपसाठी कसून तयारी केली आहे. ओमान विरूद्दच्या सामन्यात सिकंदर रझाने खणखणीत शतक ठोकलं आहे. सिकंदर रझाने चौथ्या स्थानावर उतरून 67 बॉलमध्ये 110 धावांची मोठी खेळी केली होती. या त्याच्या खेळीत त्याने 7 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार लगावले आहेत. 165.17 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या होत्या. ड़ावाच्या शेवटी सिकंदर रझा रिटायर्ड आऊट झाला, नाहीतर या खेळाडूने आणखीण धावाचा डोंगर उभारला असता. तसेच सिकंदरसह रयान बर्ल या खेळाडूची त्याला उत्तम साथ लाभली.रयानने 52 बॉलमध्ये 68 धावा केल्या.

हे ही वाचा : ODI World Cup 2023 : ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, वेळापत्रक आलं समोर

झिम्बाब्वेने पहिली फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 367 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेली ओमान 339 धावा करून अपयशी ठरली होती. फक्त 28 धावांनी त्यांचा विजय हुकला होता. त्यामुळे ओमानने झिम्बाब्वेला कॉंटे की टक्कर दिली होती. ओमानच्या संघातून आकिब इलयासने 104 बॉलमध्ये 115 धावा ठोकल्या.या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. अयान खान या खेळाडूने त्याला चांगली साथ दिली. अयान खानने 76 बॉलमध्ये 91 धावा ठोकल्या. अवघ्या 9 धावामुळे त्याचे शतक हुकले होते. ओमानचा संघ 49.4 ओव्हरपर्यंत ऑलआऊट झाली आणि 28 धावांनी त्यांचा पराभव झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सामन्यात सिकंदर रझाने (sikandar raza) निव्वळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही कमाल करून दाखवली होती. रजाने 8 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले होते.सिकंदरसह ब्रेड इवांसने 5.4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान सिकंदर रझाच्या या ऑलराऊंडर खेळीने त्यांनी ओमानवर विजय मिळवला.

हे ही वाचा : Ind vs Wi : सीनियर खेळाडूंचा पत्ता कट! वेस्ट इंडिज दौऱ्यात युवांना मिळणार संधी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT