कौतुकास्पद ! ऋषभ पंत मॅच फी उत्तराखंडमधील बचावकार्याला देणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तराखंडमधील चमोली भागात हिमकडा कोसळून झालेल्या अपघातात मोठी जिवीत आणि वित्तहानी झाली. रविवारी ही दुर्घटना घडल्यानंतर ITBP, NDRF व इतर बचावयंत्रणा अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. या दुर्घटनेत अनेक घरं वाहून गेली असल्यामुळे अनेकांचा संसार उध्वस्त झाला आहे. सोशल मीडियावरही सर्व स्तरातून या घटनेवर दुःख व्यक्त केलं जात आहे. टीम इंडियाचा विकेटकिपीर बॅट्समन ऋषभ पंतही उत्तराखंडमधील बचावकार्यासाठी धावून आला आहे.

ऋषभने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चेन्नई टेस्ट मॅचमधलं आपलं मानधन उत्तराखंडमधील बचावकार्याला देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ऋषभ पंतने लोकांना बचावकार्यात सहभागी होण्याचं आवाहनही केलंय. दरम्यान, चेन्नई टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडने ५७८ रन्सचा डोंगर उभा केल्यानंतर टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. रोहित शर्मा, गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे बिनीचे शिलेदार माघारी परतल्यानंतर पंतने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चेन्नईच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक झळकावण्याची संधी ऋषभ पंतला चालून आली होती. पण इथेही पंतने हाराकिरी करत आपली विकेट फेकली. डोम बेसच्या बॉलिंगवर ९१ रन्सवर पंत आऊट झाला. टीम इंडियाने पहिल्या डावात ३३७ पर्यंत मजल मारली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT