Olympics Medal Winner मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकरची भेट
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. वेटलिफ्टर मीराबाईने यासंदर्भातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी सचिनने मीराबाईचं रौप्यपदक पाहिलं. मीराबाईचं कौतुकही केलं. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकाचं खातं उघडलं होतं. वेटलिफ्टींग प्रकारात 49 किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली आहे. स्नॅच […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. वेटलिफ्टर मीराबाईने यासंदर्भातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी सचिनने मीराबाईचं रौप्यपदक पाहिलं. मीराबाईचं कौतुकही केलं.
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकाचं खातं उघडलं होतं. वेटलिफ्टींग प्रकारात 49 किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने दुसरं स्थान पटकावलं. कर्नम मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टींग प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी मीराबाई चानू पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये 84 आणि 87 किलो वजन सहज उचललं. ज्यामुळे या प्रकारात मीराबाईने दुसरं स्थान मिळवलं. दरम्यान चीनच्या होऊ झिऊने 94 किलो वजन उचलत ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली.
मीराबाईने पदक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने तिचं कौतुक केलं. मीराबाई चानूने करून दाखवलेली कामगिरी अविश्वसनीय आणि अतुलनीय आहे. दुखापत झाल्यानंतरही ज्या पद्धतीने मेहनत घेऊन तिने स्वतःला सावरलं आणि ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकलं हे उल्लेखनीय आहे. भारताला तुझ्या कामगिरीचा अभिमान वाटतो असं म्हणत सचिनने तिचं कौतुक केलं.