India vs Pakistan : “मोदी साहेबांना माझी विनंती…;” शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

मुंबई तक

Shahid Afridi India vs Pakistan : क्रिकेट विश्वात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन संघांच्या क्रिकेट (Cricket) सामन्याची दोन्ही देशातील प्रेक्षक कायमचं वाट बघतं असतात. मात्र ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे या दोन्ही देशांदरम्यान मागील 11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येत आहेत. (Former Pakistan captain Shahid Afridi […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

Shahid Afridi India vs Pakistan :

क्रिकेट विश्वात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन संघांच्या क्रिकेट (Cricket) सामन्याची दोन्ही देशातील प्रेक्षक कायमचं वाट बघतं असतात. मात्र ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे या दोन्ही देशांदरम्यान मागील 11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येत आहेत. (Former Pakistan captain Shahid Afridi has appealed to Indian Prime Minister Narendra Modi)

अशात आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटला परवानगी द्यावी, अशी विनंती त्याने पंतप्रधान मोदींना केली. कतारमधील दोहा येथे लीजेंड लीग क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. यात आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील आशिया लायन्सने वर्ल्ड जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर आफ्रिदीने मीडियाशी संवाद साधला.

‘भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट होऊ द्या’ : आफ्रिदीची विनंती

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, ‘मी मोदींना विनंती करतो की, दोन्ही देशांमध्ये (भारत आणि पाकिस्तान) क्रिकेट होऊ द्या. दोन्ही देशांमधील संबंधांवर तो म्हणाला की, ”जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि तो आपल्याशी बोलतच नसेल तर आपण यात काय करू शकतो.”

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका