Shubman Gill Health : शुभमन पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? समोर आले महत्त्वाचे अपडेट
शुभमन गिलच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी त्याला फीट होण्यासाठी किती काळ लागेल याबद्दल माहिती दिली आहे. पण, पाकिस्तानविरुद्ध खेळेल की नाही, याबद्दल अनिश्चित आहे.
ADVERTISEMENT

Shubman gill latest health Updates : भारताचा सलामीवीर शुभमन गिल डेंग्यमुळे रुग्णालयात भरती झाला अन् विश्वचषक मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. आता गिलची प्रकती सुधारली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात कधी परतणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. डेंग्यूचा त्रास झाल्यानंतर शुभमन गिलला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागेल याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. आजतकने राजधानी दिल्लीतील डॉक्टरांशी बोलून तो कधीपर्यंत फीट होईल याबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे.
गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ.अतुल गोगिया यांनी सांगितले की, डेंग्यू बरा होणे अनेकदा व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. साधारणपणे बरे होण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात. ज्या लोकांना बसून ऑफिसचे काम पूर्ण करावे लागते ते आठवडाभरानंतरही ऑफिसला जाऊ शकतात.
गिलला बरे होण्यासाठी लागणार 10-15 दिवस
शुभमन गिलबद्दल बोलायचे झाले तर त्याला बरे होण्यासाठी 10-15 दिवस लागतील. धावणे, विश्वचषकाचे दडपण सहन करणे, दीर्घकाळ मैदानात उभे राहणे हे त्यांचे काम असल्याने शरीराला तंदुरुस्तीची उच्च पातळी गाठावी लागते. त्यामुळे वेळ लागेल.