स्मृती मंधाना ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात ‘क्लीन बोल्ड’, Live कॉन्सर्टमध्येच प्रेमाची कबुली
टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना (smriti mandhana) आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल (palash muchhal) हे दोघेही नात्यात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते, त्याचसोबत दोघांच्या इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो देखील आहेत.
ADVERTISEMENT
टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना (smriti mandhana) आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल (palash muchhal) हे दोघेही नात्यात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते, त्याचसोबत दोघांच्या इंन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो देखील आहेत. त्यामुळेच दोघांच्या नात्यांच्या चर्चांना बळ मिळालं होतं. त्यात आता या नात्यावर शिक्कामोर्तब झालंय. या संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओवरून दोघेही नात्यात असल्याचे कयास बांधले जात आहेत. मात्र दोघांनीही अद्याप समोर येऊन या नात्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आहे. (smriti mandhana team india cricketer and palash muchhal bollywood singer accept proposal viral video)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
इंस्टाग्रामवर smritipalash18 नावाच्या हॅंडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आली आहे. हा व्हिडिओ पलाश मुच्छल याच्या क़ॉन्सर्टची आहे. पलाश मुच्छल हा बॉलिवुडची प्रसिद्ध सिंगर पलक मुच्छल हिचा भाऊ आहे. पलाश मुच्छलच्या कॉन्सर्टच्या या व्हिडिओत तो स्मृती मंधानाला प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. पलाशने या व्हिडिओत स्मृती मंधानाला आय लव यू म्हटलं आहे. I love you to Smriti असे पलाशने त्याच्या कॉन्सर्टमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा : Nitin Desai: नि:शब्द शोकांतिका! धनुष्यबाण बनवला अन् मधोमध उभं राहून घेतला गळफास
हे वाचलं का?
व्हायरल व्हिडिओत पलाशने स्मृती मंधानाला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगत तिच्यासाठी गाणे गायले होते. या गाण्या दरम्यानच पलाशने स्मृती मधंनाला आय लव्ह यु टू म्हटलं होतं, याचाच अर्थ या नात्यात स्मृती मंधानाने पलाशला सुरूवातीला आय लव्ह यु म्हटलं होतं. तसेच या व्हायरल व्हिडिओला एक कॅप्शन देखील देण्यात आली आहे. या कॅप्शनमध्ये म्हटलेय की, मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे, पलाशने स्मृतीचे नाव घेतले आहे. अखेर 4 वर्षानंतर नात अधिकृत करण्यात आले आहे.
View this post on Instagram
ADVERTISEMENT
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासूनच स्मृती मंधना आणि पलाश नात्यात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. स्मृती मंधनाने 18 जुलैला तिचा वाढदिवस बांग्लादेशमध्ये साजरा केला होता. या दरम्यान पलाश देखील बांग्लादेशमध्ये पोहोचला होता. सध्या या व्हायरल व्हिडिओवरून दोघेही नात्यात असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोघांनीही या नात्यावर अद्याप तरी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, अथवा कोणतीच पोस्ट टाकली नाही आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Nitin Desai Suicide अन् Audio क्लिप… ‘ते’ 4 उद्योजक कोण?, Inside स्टोरी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT