IPL 2021- अखेर हैदराबादचा सन’राईज’; पंजाबवर मात करत मिळवला पहिला विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलचा 14 वा सिझन सुरु झाला असून या सिझनमधील पहिला विजय सनरायझर्स हैदराबादने मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने केएल राहुलच्या पंजाब किंगजवर सहजरित्या मात केली आहे. पंजाबने हैदराबादला 120 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला हैदराबादने सहजरित्या पूर्ण करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे.

ADVERTISEMENT

पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पंजाबच्या संघाची साजेशी होऊ शकली नाही. फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला आज मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर पॉवरप्लेमध्ये अग्रवाल आणि ख्रिस गेल यांनी काही रन्स केले. 6 ओव्हरनंतर पंजाबला केवळ 32 धावा केल्या. राशिद खानने ख्रिस गेलचा अडथळा दूर करत हैदराबादला मजबूत स्थितीत आणलं. त्यानंतर पंजाबच्या फलंदाजांची पडझड सुरु झाली. 119 मध्ये पंजाबचा संपूर्ण संघ तंबूत परतला. खलील अहमद तसंच अभिषेक शर्मा यांनी हैदराबादकडून गोलंदाजी करताना पंजाबच्या फलंजांची दाणादाण उडवली.

हे वाचलं का?

हैदराबादच्या संघात आज केन विलियम्सन आणि केदार जाधव यांचा समावेश करण्यात आला होता. पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र कर्णधार वॉर्नर 37 धावांवर आऊट झाला. त्यानंतर विलियम्सन आणि बेयस्ट्रोने हैदराबादला विजय मिळवून दिला. बेयस्ट्रोने उत्तम खेली करत 63 धावा केल्या.

ADVERTISEMENT

विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या हैदराबादला अखेर स्पर्धेतील पहिला विजय मिळाला आहे. यापूर्वी हैदराबादने सलग 3 सामने गमावले होते. तर पंजाबने पंजाबने आतापर्यंत तिसरा सामना गमावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT