Suresh Raina नं फक्त भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा का केली?

मुंबई तक

भारतीय संघाचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. यानंतर सुरेश रैना देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळणार होता. मात्र आता रैनाने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सुरेश रैनानं ट्विट करत दिली माहिती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय संघाचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. यानंतर सुरेश रैना देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळणार होता. मात्र आता रैनाने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

सुरेश रैनानं ट्विट करत दिली माहिती

सुरेश रैनाने आपण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याची घोषणा केली आहे. रैनानं ट्विट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. सुरेश रैनाने उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनलाही आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. जरी तो देश-विदेशातील इतर लीगमध्ये भाग घेऊ शकतो. तो रोड-सेप्टी मालिकेने सुरुवात करणार आहे.

जय शाह, राजीव शुक्लांचे मानले आभार

सुरेश रैना माध्यमांशी बोलताना म्हणला, “सध्या मला दोन-तीन वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. आता उत्तर प्रदेशच्या संघात चांगले खेळाडू आले आहेत. त्यांनी संघाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मी UPCA कडून NOC घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत मला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि यूपीसीएचे आभार मानतो. आता मी उर्वरित लीग खेळण्यास मोकळा आहे.”

रोड सेफ्टी सिरीजपासून करणार सुरुवात

सुरेश रैनाला त्याच्या भविष्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मी 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये प्रथम खेळणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, यूएई या लीगनेही माझ्याशी संपर्क साधला आहे. गोष्टी स्पष्ट होताच मी तुम्हाला कळवीन.”

चेन्नईनं बोली न लावण्यानं सुरेश रैना झाला होता नाराज

चेन्नई सुपर किंगनं मागच्या हंगामात सुरेश रैनाला संघात घेतले नव्हते. त्यामुळं तो अनसोल्ड राहिला होता. सुरेश रैनावरती बोली न लावल्यानं चेन्नईच्या संघाला त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू अनसोल्ड राहिल्याने तो सर्वांनाच आश्चर्याचा धक्का होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp