India Tour of South Africa: Omicron चा धोका, टीम इंडियाच्या अफ्रिका दौऱ्याबाबत सस्पेंस वाढला; कारण..
India Tour of South Africa: कोव्हिड-19 चा नवा व्हेरिएंट Omicronचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आता भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे. क्रिकेट दक्षिण अफ्रिका (CSA) ने संघातील काही सदस्य कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर देशांतर्गत सामन्यांची एक फेरी पुढे ढकलली आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात होणाऱ्या भारताच्या अफ्रिकन दौऱ्याबाबत चिंता वाढली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ […]
ADVERTISEMENT

India Tour of South Africa: कोव्हिड-19 चा नवा व्हेरिएंट Omicronचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आता भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे. क्रिकेट दक्षिण अफ्रिका (CSA) ने संघातील काही सदस्य कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर देशांतर्गत सामन्यांची एक फेरी पुढे ढकलली आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात होणाऱ्या भारताच्या अफ्रिकन दौऱ्याबाबत चिंता वाढली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच या दौऱ्याबाबत निर्णय घेईल. कारण या मालिकेची सुरुवात ही 17 डिसेंबरपासून होणार आहे. कसोटी मालिकेपासून हा दौरा होणार आहे. त्यामुळे जर भारत-दक्षिण अफ्रिका मालिका झाली तर ती कठोर जैविक दृष्ट्या सुरक्षित (बायो-बबल) वातावरणात होईल.
CSA बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘क्रिकेट दक्षिण अफ्रिका डिव्हिजन 2 CSA चार-दिवसीय होम सीरिजच्या चौथ्या फेरीतील सर्व तीन सामने, जे 2 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार होते, पुढे ढकलत आहे.’
ही स्पर्धा जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात होत नाही आणि गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या चाचणीत काही जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले आहेत. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.