T-20 World Cup : दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात, UAE मध्ये रंगणार Ind vs Pak सामन्याचा थरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईमध्ये पार पडणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीची गटवारी आज जाहीर करण्यात आली आहे. समस्त क्रिकेटविश्वाचं ज्या सामन्याकडे लक्ष असतं त्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची मेजवानी यंदाही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

भारत आणि पाकिस्तान यांना दुसऱ्या गटात स्थान मिळालेलं असून याच गटात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश असणार आहे. याव्यतिरीक्त पात्रता फेरी जिंकणाऱ्या दोन संघांनाही या गटात स्थान मिळणार आहे. पहिल्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या संघांना स्थान देण्यात आलं आहे.

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत टी-२० विश्वचषक स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. टी-२ै० विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क यंदा बीसीसीआयकडे आहेत. बीसीसीआयला ही स्पर्धा यंदा भारतात आयोजित करायची होती, परंतू कोरोनामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि आयपीएल मध्यावधीत स्थगित करावं लागल्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा युएईत आयोजित करायचं ठरवलं. स्पर्धा युएईत आयोजित होणार असली तरीही आयोजनाचे हक्क हे बीसीसीआयकडेच असणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT