Team India Squad West Indies Series : टीम इंडियाची घोषणा, संघात मोठे फेरबदल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Team India Squad West Indies Series : Cheteshwar Pujara has been dropped from the Test team. Ajinkya Rahane has been promoted as vice-captain
Team India Squad West Indies Series : Cheteshwar Pujara has been dropped from the Test team. Ajinkya Rahane has been promoted as vice-captain
social share
google news

विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माचं संघाचे नेतृत्व करणार असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून, त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Team India was announced by the BCCI on Friday (June 23) for the ODI and Test series against the Windies.)

ADVERTISEMENT

युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वीला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचीही वनडे संघात निवड झाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ICC Test Ranking : टॉप 10 सोडाच! टेस्ट रॅकिंगमध्ये विराट कोहलीने गमावलं स्थान

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

हेही वाचा >> Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल. युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

ADVERTISEMENT

12 जुलैपासून सुरू होणार विंडीज दौरा

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आधी दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.

ADVERTISEMENT

वेस्ट इंडिज दौरा : टीम इंडियाचे वेळापत्रक

पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

पहिला एकदिवसीय – 27 जुलै, ब्रिजटाऊन
दुसरी वनडे – 29 जुलै, ब्रिजटाऊन
तिसरी एकदिवसीय – 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

हेही वाचा >> Team India : भारतीय संघाचं काय बिनसलं? खेळाडूंमध्ये जाणवतेय ही उणीव

1ली T20 – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
2रा T20 – 6 ऑगस्ट, गयाना
तिसरा T20 – 8 ऑगस्ट, गयाना
चौथा T20 – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा T20 – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT