Team India : भारतीय संघाचं काय बिनसलं? खेळाडूंमध्ये जाणवतेय ही उणीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

the Indian players were not even mentally fit to play the final match and there was a clear lack of enthusiasm and passion in them.
the Indian players were not even mentally fit to play the final match and there was a clear lack of enthusiasm and passion in them.
social share
google news

Team India players looked mentally tired : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC)अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाच्या खराब कामगिरीचे प्रमुख कारण खेळाचा ताण असल्याचे सांगितले जात आहे, कारण बहुतेक खेळाडू अंतिम सामन्यापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये गुंतलेले होते.

खेळाडू दिसत होते मानसिकदृष्ट्या थकलेले

तसं पाहिलं तर भारतीय खेळाडू अंतिम सामना खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त नव्हते आणि त्यांच्यात उत्साह आणि जोश यांचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसत होते. टीम इंडियाच्या खेळाडूंची अशाप्रकारे निराशाजनक कामगिरी आगामी काळातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी निश्चितच चांगली चिन्हे नाहीयेत. WTC अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्याचा ब्रेक मिळाला आहे. या ब्रेकचा फायदा ते स्वत:ला मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी करून घेऊ शकतात.

टीम इंडियाच्या खेळाडूंना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वेळोवेळी पावले उचलत आहे. गेल्या वर्षी विशेषत: T20 विश्वचषकापूर्वी पॅडी अप्टन यांची मेंटल कंडीशनिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण, पॅडीला संघ व्यवस्थापनाचा भाग बनवून फारसा उपयोग झाला नाही आणि उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून वाईट पराभव झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Asia cup 2023 : बुमराह टीम इंडियासाठी कधी परतणार मैदानात! मोठी अपडेट

पॅडी 2011 च्या विश्वचषकादरम्यान गॅरी कर्स्टनच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफचा देखील भाग होता. त्या वर्षी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकून 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता.

गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाची अवस्था वाईट आहे. 2013 पासून टीम इंडियाला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. टीम इंडियाला 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक (2015) आणि टी-20 विश्वचषक (2016) च्या उपांत्य फेरीतही भारताचा पराभव झाला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब

भारताची परिस्थिती चॅम्पियन्स ट्रॉफी (2017) आणि 2019 च्या विश्वचषकातही अशीच होती. 2021 आणि 2022 चा टी-20 विश्वचषकही भारतासाठी निराशाजनक होता. त्याचबरोबर 2021 आणि 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला होता.

ADVERTISEMENT

गेल्या 10 आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची स्थिती

2013 चॅम्पियन्स ट्रॉफी – अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव
2014 T20 विश्वचषक – अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभव
2015 एकदिवसीय विश्वचषक – उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने केला पराभव
2016 T20 विश्वचषक – उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभव
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी – फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभूत
2019 एकदिवसीय विश्वचषक – उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून स्वीकारावा लागला पराभव
2021 कसोटी चॅम्पियनशिप – न्यूझीलंडने अंतिम फेरीत केला होता पराभव
2021 T20 विश्वचषक – साखळी सामन्यातूनच भारत बाहेर झाला
2022 T20 विश्वचषक – उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत
2023 कसोटी चॅम्पियनशिप – अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

हेही वाचा >> ‘…तर भारतात वर्ल्डकपही खेळणार नाही’, जावेद मियादादने बीसीसीआयला डिवचलं

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय संघाला 11 पैकी 6 आयसीसी फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह भारताने सर्वाधिक वेळा आयसीसी फायनल हरण्याच्या बाबतीत इंग्लंडची बरोबरी केली. या बाबतीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी 12 पैकी 9 आयसीसी फायनल जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

ब्रेक ठरू शकतो फायदेशीर!

टीम इंडियाचे खेळाडू स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी या ब्रेकचा फायदा घेत आहेत. तसेच, ब्रेक प्रेशरचा सामना करण्यासाठी ते प्रभावी ठरू शकते. 2015 च्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते, तसेच तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीतही टीम इंडिया शकली नव्हती. त्यानंतर या धक्क्यातून सावरण्यासाठी भारतीय खेळाडूंनी आठवडाभर सराव केला नाही. त्या ब्रेकचा परिणाम टीम इंडियाच्या खेळाडूंवर स्पष्टपणे दिसून आला आणि 2015 च्या विश्वचषकात एकही सामना न गमावता भारताला उपांत्य फेरी गाठता आली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT