Tokyo Olympics मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व, प्रवीण जाधवच्या कुटुंबाला साताऱ्यात घर पाडण्याची धमकी

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व केलेल्या महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवला आता घराच्या बांधकामावरुन शेजारच्याच्या कलहाला तोंड द्यावं लागत आहे. ४ गुंठे जमिनीच्या तुकड्यावरुन सुरु झालेला वाद अखेरीस प्रशासनापर्यंत पोहचला असून, प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली असतानाही समाधानाने राहता येत नसेल तर गावात राहून करायचं तरी काय असा सवाल प्रवीण जाधवच्या कुटुंबाने विचारला आहे.

ADVERTISEMENT

साताऱ्यच्या फलटणपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सरडे गावात प्रवीण आणि त्याचं कुटुंब राहतं. याच गावात प्रवीणचं शिक्षण होऊन तो मोठा झाला. प्रवीणचं कुटुंब याच गावात मजुरी करुन घर चालवतं. प्रवीणचे आई-बाबा, चुलत भाऊ आणि चुलती असं चार लोकांचं कुटुंब दोन खोल्यांमध्ये राहतं.

जाधव कुटुंबाकडे स्वतःचं घर नसल्यामुळे शेती महामंडळाने त्यांना ८४ गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे जागा घर बांधणीसाठी दिली. मात्र या जागेवर बांधकाम करायला जाधव कुटुंबाच्या शेजारच्यांचा विरोध आहे आणि याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरु झालाय. प्रवीणच्या कुटुंबाने यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली.

हे वाचलं का?

“फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांनी आम्हाला घर बांधणीसाठी जागा मोजून दिली आहे. शेती महामंडळाच्या ८४ गुंठे शिल्लक क्षेत्रातील जागा आम्हाला मोजून देण्यात आली. असं असतानाही शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत आहेत.” प्रविण जाधवच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने दोन खोल्यांचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली. यामुळे प्रविणचे वडील रमेश जाधव यांनी गावातून सहकार्य होणार नसेल तर आम्ही दुसऱ्या गावात घरबांधून राहू, असं मत व्यक्त केलंय.

प्रविण जाधवसारख्या ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंच्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर ही निंदनीय बाब आहे. याप्रश्नी तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा सरडे गावचे माजी सरपंच रामभाऊ शेंडगे यांनी दिलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT