Tokyo Olympics 2020 : गोल्फमध्ये आदिती अशोककडून भारताला पदकाच्या आशा

मुंबई तक

भारताची गोल्फपटू आदिती अशोकने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची आशा दाखवली आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये आदिती अशोकने तीन Under 67 गुणांची कमाई करत दुसरं स्थान कायम राखलं आहे. तिसऱ्या राऊंडनंतर आदिती १२ Under 201 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आदितीने पाच बर्डी आणि दोन बोगी शॉट लगावले. आदितीने ११ व्या होलवर बोगी केल्यानंतर १५ व्या आणि १७ व्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारताची गोल्फपटू आदिती अशोकने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची आशा दाखवली आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये आदिती अशोकने तीन Under 67 गुणांची कमाई करत दुसरं स्थान कायम राखलं आहे. तिसऱ्या राऊंडनंतर आदिती १२ Under 201 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आदितीने पाच बर्डी आणि दोन बोगी शॉट लगावले. आदितीने ११ व्या होलवर बोगी केल्यानंतर १५ व्या आणि १७ व्या होलवर बर्डी शॉट लगावले. याआधी तिने चौथ्या, सहाव्या आणि सातव्या होलवरही बर्डी शॉट लगावले होते. भारताची दीक्षा डागर मात्र या प्रकारात ७२ गुणांसह तळात फेकली गेली आहे. उद्याच्या दिवसात आदितीच्या कामगिरीत हेच सातत्य राहिलं तर तिला रौप्य पदकाची आशा आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये आदिती ४१ व्या स्थानावर राहिली होती.

पदकाचा निर्णय उद्या होणार असला तरीही आदिती अशोकने आपण शेवटपर्यंत पदकाच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. “होय, मी नक्कीच पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व खेळाडू याचाच विचार करत असतात, माझ्याही मनात पदकाचा विचार असणार आहे. उद्या मी माझा सर्वोत्तम शॉट खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतात माझे काही मित्र सामना पाहण्यासाठी सकाळी लवकर उठत आहेत. हे ऐकून मला खरंच खूप आनंद झालाय.”

हे वाचलं का?

    follow whatsapp