Tokyo Paralympics : भारताकडून पदकांची Hat Trick, थाळीफेक प्रकारात विनोद कुमारला कांस्यपदक
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतला रविवारचा दिवस भारतासाठी अत्यंत चांगला ठरला आहे. एकाच दिवसात भारतीय खेळाडूंनी ३ पदकांची कमाई केली असून थाळीफेक प्रकारात भारताच्या विनोद कुमारला कांस्यपदक मिळालं आहे. आजच्या दिवशी भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये तर निषाद कुमारने उंच उडीत रौप्य पदकाची कमाई केली आहे. विनोद कुमारने १९.९१ मी. लांब थाळी फेकत आशियाई विक्रम मोडीत काढला. परंतू […]
ADVERTISEMENT

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतला रविवारचा दिवस भारतासाठी अत्यंत चांगला ठरला आहे. एकाच दिवसात भारतीय खेळाडूंनी ३ पदकांची कमाई केली असून थाळीफेक प्रकारात भारताच्या विनोद कुमारला कांस्यपदक मिळालं आहे.
आजच्या दिवशी भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये तर निषाद कुमारने उंच उडीत रौप्य पदकाची कमाई केली आहे. विनोद कुमारने १९.९१ मी. लांब थाळी फेकत आशियाई विक्रम मोडीत काढला. परंतू त्याचे हे प्रयत्न पोलंडच्या खेळाडूच्या तुलनेत कमीच पडले ज्यामुळे विनोदला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
Tokyo Paralympics : निषाद कुमारला उंच उडीत रौप्यपदक, भारताची धडाकेबाज सुरुवात
२०१६ रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ४ पदकांची कमाई केली होती. या कामगिरीची बरोबरी करण्यासाठी भारताला आणखी एका पदकाची गरज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे National Sports Day च्या निमीत्ताने पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर विनोदचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.