Tokyo Paralympics : भारताला धक्का, विनोद कुमार यांनी जिंकलेलं कांस्यपदक रद्द, जाणून घ्या काय आहे कारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना धक्का बसला आहे. रविवारी थाळीफेक प्रकारात F52 गटात भारताच्या विनोद कुमार यांनी कांस्यपदकाची कमाई केली होती. परंतू प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर disability classification assessment समितीसमोर विनोद कुमार हे F52 गटासाठी पात्र ठरत नसल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्यांचं कांस्यपदक काढून घेण्यात आलंय.

ADVERTISEMENT

प्रतिस्पर्धी खेळाडूंनी विनोद कुमार यांच्या सहभागावर आक्षेप घेतल्यामुळे या गटातील विजेत्यांचा पदक देण्याचा सोहळा पुढे ढकलण्यात आला. विनोद कुमार ज्या F52 गटात खेळत होते, त्या गटात खेळण्यासाठी स्नायू कमकूवत असणं, restricted range of movement, पायाने अंपगत्व किंवा पायांच्या उंचीत असणारा फरक हे निकष नक्की करण्यात आले होते. २२ ऑगस्टरोजी आयोजकांनी विनोद कुमार यांची तपासणी करुन त्यांना या गटात खेळण्यासाठी परवानगी दिली होती.

परंतू अंपगत्व प्रमाण समितीच्या पडताळणीत विनोद कुमार हे F52 गटात बसत नसल्याचं समोर आल्यामुळे भारताचं हे पदक काढून घेण्यात आलं. BSF मध्ये कार्यरत असलेले विनोद कुमार यांना एका अपघातात अर्धांगवायूचा झटका आला ज्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. यानंतर त्यांनी जिद्दीने प्रयत्न करत पॅरास्पोर्ट्स खेळण्यास सुरुवात केली. १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या विनोद कुमार यांनी १९.९१ मी. लांब थाळी फेकत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे या कारवाईनंतर भारताच्या खात्यातलं एक पदक कमी झालं आहे.

हे वाचलं का?

रविवारी टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल आणि उंच उडी प्रकारात निषाद कुमार यांनी रौप्यपदकाची कमाई केली होती. यानंतर विनोद कुमार यांनी कांस्यपदक मिळवत दिवसाचा शेवट गोड केला होता. सोमवारी भारताने आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवत नेमबाजीत सुवर्ण, थाळीफेक F56 प्रकारात रौप्य, तर भालाफेकीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. ६ पदकांसह भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतली ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

Tokyo Paralympics : भारतीय खेळाडूंच्या भाल्याने घेतला पदकाचा वेध, देवेंद्र झाजरियाला रौप्यपदक

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT