टीम इंडियाच्या विजयात कॅप्टन कोहली चमकला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १६५ रन्सचं टार्गेट भारताने विराट कोहली आणि इशान किशनच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर पूर्ण केलं. विराट आणि इशानने इंग्लंडच्या बॉलर्सवर हल्ला चढवत चौफेर फटकेबाजी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशान किशनने अर्धशतक झळकावत आपली संघातली निवड सार्थ ठरवली. त्याने ३२ बॉलमध्ये ५ फोर आणि ४ सिक्ससह ५६ रन्स केल्या. तर दुसरीकडे कॅप्टन विराट कोहलीने शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

विराट-इशान किशन चमकले, भारत ७ विकेट राखून विजयी

विराटने ४९ बॉलमध्ये ५ फोर आणि ३ सिक्स लगावत नॉटआऊट ७३ रन्सची इनिंग खेळली. या दरम्यान कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार रन्सचा टप्पाही पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे. सलग दुसऱ्या मॅचमध्ये लोकेश राहुल स्वस्तात आऊट झाल्यामुळे टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पेलवू शकेल का अशी शंकाही निर्माण झाली होती. परंतू विराटने सर्वात आधी इशान किशन आणि त्यानंतर पंत व श्रेयस अय्यरसोबत महत्वाची पार्टनरशीप करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हे वाचलं का?

त्याआधी, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलरला शून्यावर आऊट करत भारताने चांगली सुरुवात केली. यानंतर जेसन रॉय आणि ड्वाइड मलानने चांगली पार्टनरशीप करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. युजवेंद्र चहलने मलानला आऊट करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. यानंतर मधल्या फळीत इंग्लंडचे बॅट्समन ठराविक अंतराने आऊट होत गेले. अखेरीस इंग्लंडचा संघ १६४ रन्सपर्यंत पोहचू शकला. इंग्लंडकडून जेसन रॉयने ४६ रन्सची इनिंग खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने १-१ विकेट घेतली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT