IND vs BAN: विराट कोहलीच्या नागिन डान्सचा Video तुफान व्हायरल, तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Virat Kohli Naagin Dance Video Clip Viral
Virat Kohli Naagin Dance Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विराट कोहलीच्या नागिन डान्सचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

point

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा उडवला धुव्वा

point

विराटचा नागिन डान्स पाहून चाहत्यांनीही दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

Virat Kohli Naagin Dance Viral Video : बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये विजयाचा जल्लोष असतानाच विराट कोहलीच्या नागिन डान्सचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे. मैदानात डीजेचा धमाका सुरु होताच अनेक खेळाडूंना नाचण्याची इच्छा होते. पण विराट कोहली त्याच्या हटके अदांमुळे नेहमीच चर्चेत येतो. आताही विराटच्या नागिन डान्सने संपूर्ण क्रिडाविश्वात हशा पिकवला आहे. बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना विराटने हा डान्स करुन तमाम क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन केलं आहे. 

बांगलादेशच्या खेळाडूंनी अशाप्रकारचा नागिन डान्स करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. बांगलादेशचा संघ जेव्हा एखादा सामना जिंकतो, तेव्हा त्यांचे खेळाडू नागिन डान्स करतात. आता कोहलीनेही पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना नागिन डान्सची पोज देऊन चाहत्यांचं मनोरंजन केलं. विराटच्या नागिन डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

 हे ही वाचा >> Raj Thackeray : "तो सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही", लोकप्रिय अभिनेत्याला इशारा

विराटच्या चाहत्यांनी या व्हिडीओला खूप पसंती दर्शवली आहे. याआधी रिषभ पंत आणि शुबमन गिलने भारताच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. पंतने 109 आणि शुबमन गिलने नाबाद 119 धावा केल्या. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागिदारी रचली. या धावांच्या जोरावर भारताने 287 धावांवर इनिंग घोषित केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथे पाहा विराट कोहलीची मजेशीर व्हिडीओ

त्यामुळे भारताला एकूण 514 धावांचा लीड मिळाला. बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं आव्हान होतं. दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या संघाची 149 धावांवर दाणादाण उडाली. बांगलादेशने दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्सवर 158 धावा केल्या होत्या. परंतु, लाईट्सच्या समस्येमुळं सामना 4 वाजून 25 मिनिटांनी थांबवण्यात आला.

हे ही वाचा >> Gold Rate Today: सोनं घ्या सोनं! पण एकदा भाव तर वाचा, 'या' 15 शहरांना बसला महागाईचा चटका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT