Virat Kohli : किंग कोहली ODI-T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? ब्रेकच्या निर्णयाने खळबळ
Virat Kohli break From white-ball cricket : विराट कोहलीच्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीला खेळताना बघण्यास उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा होणार आहे.
ADVERTISEMENT
Virat Kohli Break from White-ball Cricket : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने या विश्वचषकात 11 सामन्यांमध्ये सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. पण, आता कोहलीच्या एका निर्णयाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Virat Kohli will not play in odi and t20 Series against south africa)
सध्या भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका मायदेशात खेळत आहे. भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
कोहलीने व्हाईट बॉल क्रिकेटमधून घेतला ब्रेक
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. पण, याआधी भारतीय चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Virat Kohli-Rohit Sharma : गुडन्यूज! विराट-रोहितला वर्ल्ड कपमधील कामगिरीचं मिळालं फळ
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात व्हाईट बॉल क्रिकेट (ODI-T20) मालिका म्हणजे एकदिवसीय आणि टी20 मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार कोहलीने व्हाईट बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ही माहिती बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिली आहे.
कोहली व्हाईट बॉल क्रिकेट कधी खेळणार?
कोहली व्हाईट बॉल (ODI-T20) क्रिकेट खेळताना कधी दिसणार किंवा तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, कोहलीने बीसीसीआय आणि निवड समितीला सांगितले आहे की, तो व्हाईट बॉल क्रिकेटसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती तो स्वतः देईल. त्यामुळे कोहलीने व्हाईट बॉल क्रिकेटपासून दूर जाण्यास सुरूवात केली असल्याचा कयास लावला जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 200 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार, विराट-रोहितला संघात स्थान मिळणार की नाही?
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माकडून अद्याप असे कोणतेही विधान समोर आलेले नाही. मात्र तोही आफ्रिका दौऱ्यावर व्हाईट बॉल क्रिकेट मालिका खेळणार नसल्याचे मानले जात आहे. कोहली आणि रोहित दोघेही कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत.
ADVERTISEMENT
राहुल किंवा बुमराहला मिळू शकते कर्णधारपद
कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. रोहित शर्माही लंडनमध्ये आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकून नवा विक्रम रचला. जर रोहित आफ्रिकेविरुद्ध व्हाईट बॉल क्रिकेट फॉरमॅटपासून दूर राहिला, तर यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.
हेही वाचा >> ICC New Rule : आता संघाला होणार 5 धावांचा दंड, ICC चा 60 सेकंदाचा नवा नियम काय?
याशिवाय जसप्रीत बुमराहही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रथम 3 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे, त्यातील पहिला सामना 10 डिसेंबर रोजी डर्बन येथे होणार आहे. यानंतर 17, 19 आणि 21 डिसेंबरला तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.
ADVERTISEMENT