Ind vs Pak, Asia cup 2022 : नाणेफेक ठरणार निर्णायक, पाकिस्तानविरोधात भारताचं पारडं जड
आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या ब्लॉकबस्टर सामन्यात स्टार फलंदाज रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, बाबर आझम पाकिस्तान संघाची कमान सांभाळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर दोन्ही संघांमध्ये एक अतिशय मनोरंजक […]
ADVERTISEMENT

आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या ब्लॉकबस्टर सामन्यात स्टार फलंदाज रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, बाबर आझम पाकिस्तान संघाची कमान सांभाळणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर दोन्ही संघांमध्ये एक अतिशय मनोरंजक सामने झाले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने चार वेळा नाणेफेक जिंकलं तर एका वेळी भारतीय संघाने नाणेफेक जिंकला. भारतीय संघाने तीन सामने जिंकले, तर पाकिस्तानी संघाला दोन वेळा यश मिळाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मागील पाच सामन्यांचे निकाल जाणून घेऊया.
1. T20 विश्वचषक 2021 (पाकिस्तान जिंकला):
24 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला . नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 151 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक 57 धावा काढल्या. दुसरीकडे पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन बळी घेतले.प्रत्युत्तरात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यातील 152 धावांच्या नाबाद भागीदारीने भारताची कोंडी केली. विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानी संघाचा हा पहिला विजय ठरला.