Rishabh Pant Accident: डोकं, गुडघ्याला दुखापत.. पंतचं करिअर धोक्यात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rishabh Pant Accident and his Carrer: देहरादून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा आज (30 डिसेंबर) पहाटे अपघात (Car Accident) झाला. ऋषभ पंतला दिल्लीहून उत्तराखंडला जात असतानाच हा अपघात झाला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ही बातमी समोर येताच क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.सध्या ऋषभ पंतवर उपचार सुरू सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं समजतं आहे, मात्र असं असलं तरीही ऋषभ पंतच्या कारकिर्दीचं काय होणार अशी चिंता त्याचे फॅन्स व्यक्त करत आहेत.

ऋषभ पंत गंभीर जखमी

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेनंतरही ऋषभ पंत हा मोकळा होता, कारण त्याची श्रीलंका मालिकेसाठी निवड झालेली नाही. त्यामुळे तो उत्तराखंडला म्हणजेच आपल्या घरी जात होता. पण याचवेळी त्याची कार डिव्हायडरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची दुखापत खूप गंभीर आहे.

त्याच्या कपाळावर आणि गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे डॉ. सुशील नागर यांनी सांगितले. एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर किंवा गंभीर दुखापत दिसत नाही. मात्र अद्याप एमआरआय आणि इतर रिपोर्ट्स नंतर परिस्थिती स्पष्ट होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ऋषभ पंतच्या कपाळावर दोन जखमा आहेत, एक डाव्या डोळ्याच्या वर आहे. यासोबतच त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर पाठीवरही काही व्रण उठले आहेत. अशा परिस्थितीत ऋषभ पंतला यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतरही ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यामुले श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही त्याची निवड झाली नव्हती. ऋषभ पंतला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आला होता.

ADVERTISEMENT

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, दुर्घटनेत पंतला गंभीर दुखापत

ADVERTISEMENT

बीसीसीआयने काय म्हटलं?

ऋषभ पंतच्या अपघाताबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी निवेदन जारी केले आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातानंतर ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, बोर्ड कुटुंब आणि रुग्णालयाच्या पूर्ण संपर्कात आहे आणि त्याला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या कपाळावर दोन जखणा आहेत आणि त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ऋषभ पंतचा अंगठा, टाच, मनगट आणि पाठीला देखील दुखापत झाली आहे. ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असून त्याला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी काय दिली माहिती?

आपत्कालीन विभागात पंतवर उपचार डॉक्टर सुशील नागर म्हणाले की, पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली असून त्याची अधिक तपासणी करावी लागेल, असे त्यांनी सांगितलं आहे. ‘जेव्हा त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीत होता आणि मी त्याच्याशी बोललोही, खरं त्याला अचानक घरी जाऊन त्याच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं.’

‘त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, पण मी त्याला टाके घातले नाहीत. मी तिला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले जेथे प्लास्टिक सर्जन त्याची दुखापत पाहू शकतल. एक्स-रेमध्ये तरी हाड तुटलेले नाही. पण उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे या दुखापतीचं गांभीर्य किती आहे हे एमआरआय किंवा इतर चाचण्यांमधून समजू शकेल.’

लिगामेंटची दुखापत बरी होण्यासाठी दोन ते सहा महिने लागतात. पंतच्या पाठीवर मोठी जखम झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ज्या जखमा दिसत आहेत त्याआगीमुळे झालेल्या जखमा नाहीत.

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या कार अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये

डॉ. नागर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘त्याच्या पाठीला जखम झाली कारण जेव्हा गाडीला आग लागली त्यावेळी त्याने कारची खिडकी तोडली तिथून उडी मारली. त्याचवेळी त्याच्या पाठीला जखमा झाल्या. त्यामुळे या जखमा काही गंभीर नाहीत.’

डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिशांत याज्ञिक यांनी सांगितले की, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन यांची एक टीम पंतवर उपचार करत आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, पंतच्या उपचारांचा संपूर्ण संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे.

पंतचं करिअर धोक्यात?

ऋषभ पंतच्या दुखापत सध्या तरी गंभीर दिसत आहेत, रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पंतला बरे होण्यासाठी 6 महिने लागू शकतात. पण टीम इंडियाच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर ऋषभ पंत आगामी काळात होणाऱ्या मोठ्या आणि महत्त्वाची मालिकांना मुकू शकतो.

फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका होणार आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ऋषभच्या T-20, ODI मधील निवडीवरही शंका आहे. पण तो कसोटीत सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत जर तो बरा झाला नाही तर टीम इंडियाचीही चिंता वाढू शकते.

यानंतर, इंडियन प्रीमियर लीग मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये म्हणजे 2 महिने सतत क्रिकेट खेळावं लागतं, ज्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. पण जर आता झालेल्या दुखापतीतून ऋषभ पंत सावरला नाही तर त्याला आयपीएललाही मुकावे लागू शकते. अशा परिस्थितीत या मोठ्या गोष्टी ऋषभ पंतसाठी करिअरच्या दृष्टीने अडचणीच्या ठरु शकतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT