WTC : भारताविरुद्धच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची 4 वर्षानंतर मैदानात वापसी

मुंबई तक

ADVERTISEMENT

wtc final 2023 australia declare there squad for the wtc
wtc final 2023 australia declare there squad for the wtc
social share
google news

Australia Team For WTC Final : देशात आयपीएलची (IPL) धुम सुरु आहे, एका पेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. या स्पर्धेदरम्यानच मोठी अपडेट समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या संघात 4 वर्षानंतर एक खेळाडू मैदानात वापसी करणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा हा संघ किती मजबूत आहे आणि टीम इंडियावर भारी पडू शकतो का? हे जाणून घेऊयात. (wtc final 2023 australia declare there squad for the wtc mitchell marsh return team after 4 year against team india)

कोण आहे ‘तो’ खेळाडू

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात येत्या जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (wtc final 2023) फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ऑलराऊंडर मिचेल मार्च (mitchell marsh) 4 वर्षानंतर मैदानात वापसी करणार आहे. मार्शला ऑस्ट्रेलियाच्या 17 सदस्यीय संघात सामील करण्यात आले आहे. या संघात अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर देखील आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी एक अनुभवी संघ मैदानात उतरवणार आहे.

हे ही वाचा : चुकीला माफी नाही… कोहलीला दणका! मोठी कारवाई

ऑस्ट्रेलियाकडून सलामीसाठी डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या खेळाडूंना संघात सामील केले आहे. यासोबतच सलामीसाठी मार्कस हॅरीस देखील संघात असणार आहे. या संघात 4 वेगवान गोलंदाज आहेत. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि स्कॉट बोलेंड यासोबतच ऑलराऊंडर कॅमरन ग्रीन आणि मार्शला संघात सामील करण्यात आले आहे. तर संघात नाथन लायन आणि टॉड मर्फी ही स्पिनर जोडी देखील संघात असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कधी रंगणार WTC?

वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपसाठी (wtc final 2023) निवडले गेलेले खेळाडू अॅशेसच्या पहिल्या दोन टेस्ट सामन्यातही दिसणार आहे.वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिप 7 ते 11 जून दरम्यान द ओवल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर अॅशेसची सुरुवात 16 जूनपासून होणार आहे.यामध्ये पहिली टेस्ट 16 ते 20 जून दरम्यान एजबेस्टन क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. तर दुसरा टेस्ट सामना 28 जून ते 2 जूलै दरम्यान लॉर्डस मैदानात खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा : वडिलांनी नोकरी सोडली, कोचने खिल्ली उडवली; त्याने पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स कर्णधार, स्कॉट बोलेंड, एलेक्स केरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रॅनशो, स्टीव स्मिथ उप कर्णधार, मिचेल स्टार्क,डेविड वॉर्नर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT