Team India Squad World Cup 2023: संजू सॅमसनचे स्वप्न भंगले, केएल राहुलने दिला धक्का, निवडीची Inside Story

भागवत हिरेकर

विश्वचषक 2023, टीम इंडिया निवड : युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळाली का? केएल राहुलची का करण्यात आली निवड? श्रेयस अय्यरला टीम इंडियात जागा का मिळाली?

ADVERTISEMENT

Team India Squad for World Cup 2023 Analysis : Chief selector Ajit Agarkar and captain Rohit Sharma announced the squad for the World Cup 2023
Team India Squad for World Cup 2023 Analysis : Chief selector Ajit Agarkar and captain Rohit Sharma announced the squad for the World Cup 2023
social share
google news

Team India Squad for World Cup 2023 Analysis in Marathi : सध्याच्या आशिया कपमध्ये टीम इंडियाचे 17 सदस्य आणि संजू सॅमसन प्रवासी राखीव म्हणून समाविष्ट आहेत. आशिया कप सुरू असताना मंगळवारी (5 सप्टेंबर) विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली. टिळक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तर संजू सॅमसनचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्नही भंगले. मात्र, केएल राहुलच्या निवडीने सगळ्यांना धक्का बसला. फिरकीपटू कुलदीप यादवने युझवेंद्र चहलवर पुन्हा एकदा मात केली आहे.

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 5 सप्टेंबर रोजी विश्वचषक 2023 साठी संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघात युझवेंद्र चहलला संधी मिळालेली नाही, तर आशिया चषक स्पर्धेत ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून समाविष्ट केलेला संजू सॅमसनही या यादीतून बाहेर आहे.

टिळक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही विश्वचषक संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. आशिया कपमध्ये एकही सामना न खेळलेल्या केएल राहुलला विश्वचषकात स्थान मिळाले आहे. केएल राहुलच्या निवडीवर याआधीही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. विश्वचषकातील त्याच्या निवडीवर आणखी प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

विश्वचषकासाठी निवडलेल्या सध्याच्या संघावर एक नजर

विश्वचषक 2023 साठी टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहमद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

हे वाचलं का?

    follow whatsapp