Tokyo Olympic 2020 : मीराबाई चानूने उघडलं पदकांचं खातं, वेटलिफ्टींग प्रकारात रौप्य पदकाची कमाई
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकाचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारात ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने दुसरं स्थान पटकावत आपलं आव्हान कायम राखलं. यानंतर क्लिन अँड जर्क प्रकारातही मीराबाई चानूने आश्वासक खेळ करत शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतू सुवर्णपदकासाठीच्या प्रयत्नांमध्ये ती अपयशी ठरली आणि […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकाचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारात ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने दुसरं स्थान पटकावत आपलं आव्हान कायम राखलं.
यानंतर क्लिन अँड जर्क प्रकारातही मीराबाई चानूने आश्वासक खेळ करत शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतू सुवर्णपदकासाठीच्या प्रयत्नांमध्ये ती अपयशी ठरली आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Weightlifting
Women's 49kg ResultsSilver lined beginning for India! @mirabai_chanu wins Silver medal in @Tokyo2020 Weightlifting becoming the only 2nd Indian weightlifter ever to win an #Olympics medal. #WayToGo champ #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/oNqElqBGU2
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
कर्नम मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टींग प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी मीराबाई चानू पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये ८४ आणि ८७ किलो वजन सहज उचललं. ज्यामुळे या प्रकारात मीराबाईने दुसरं स्थान मिळवलं. दरम्यान चीनच्या होऊ झिऊने ९४ किलो वजन उचलत ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली.
दरम्यान ४९ किलो वजनी गटात चीनने सुवर्ण, भारताने रौप्य तर इंडोनिशियाच्या खेळाडूने कांस्य पदकाची कमाई केली. अखेरच्या राऊंडमध्ये मीराबाई चानू आणि चीनच्या खेळाडूमध्ये काटे की टक्कर सुरु होती. परंतू अखेरच्या प्रयत्नात ११७ किलो वजन उचलण्याच मीराबाई अयशस्वी ठरली आणि सुवर्णपदक चीनच्या नावे निश्चीत झालं.