Navneet Mandhaani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी मुंबई तक बैठक कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी मुंबई तक माध्यमाला मुलाखत देखील दिली होती. याच मुलाखतीत त्यांनी आतापर्यंत अंकशास्त्रानुसार वर्तवविलेल्या अंदाजामागील लॉजिक सांगितलं होतं. त्यांनी देशाचे तसेच महाराष्ट्र राज्याचे आगामी राजकारण कसं असेल याबाबत सांगितलं. देशाचे आगामी पंतप्रधान हे नरेंद्र मोदी होणार की नाही याबाबत अंदाज वर्तविलेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवरा दारू पिऊन फुल्ल टाईट, गर्भवती बायकोची विळ्याने निर्घृण हत्या
पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार का?
नवनीत मनधानी यांनी तामिळनाडू राज्याचा आगमी मुख्यमंत्री विजय थलपथी होईल अशी शक्यता वर्तवली होती. त्यांनी ठरवलेली ही शक्यता खरी ठरली आहे. अशातच त्यांनी 2029 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार असल्याची कमी शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसच्या अधिक जागा वाढण्याची शक्यता आहे. तसं जरीही असलं तरीही केंद्रात भाजपचं सरकार येणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविलाय.
एकनाथ शिंदे आगमी मुख्यमंत्री?
तसेच राज्याच्या आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचा त्यांनी अंदाज वर्तविला. निवडणूक ही 2029 मध्ये असण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस हा नऊ तारखेलाच असतो. निवडणूक 2029 या वर्षी असून त्यात देखील नऊ हा अंक येतो. हाच क्रमांक हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. तसेच त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी देखील आगामी निवडणूक फायदेशीर असल्याचा अंदाज वर्तवला.
हे ही वाचा : नर्सरीच्या विद्यार्थ्यानं पँटमध्ये केली लघवी, शिक्षिकेनं चाकू तापवला अन् दिले गुप्तांगाला भयंकर चटके
दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार पवार हे घड्याळ आतील बाजूने का घालतात यामागील लॉजिक सांगितलं. कोणालाही काहीही आपल्या योजना दिसू नये. कोणालाही आपले प्लान समजू नये, असं त्यामागील लॉजिक असल्याचे मनधानी म्हणाले.
ADVERTISEMENT












