चालताना धक्का लागल्याने वाद पेटला! रॉडने बेदम मारहाण करत मुंबईतील रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या...

मुंबईतील घाटकोपर परिसरात एका रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुंबईतील रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या...

मुंबईतील रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या...

मुंबई तक

• 10:39 AM • 22 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

चालताना धक्का लागल्याने वाद पेटला!

point

रॉडने बेदम मारहाण करत मुंबईतील रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या...

Mumbai Crime: मुंबईतील घाटकोपर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे गुरुवारी (20 नोव्हेंबर) एका वृद्ध व्यक्तीची लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरेंद्र पचडकर (65) अशी मृताची ओळख समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही रिटायर्ड रेल्वे कर्मचारी असून ती विक्रोळी येथे राहत होती. रात्री जेवणानंतर सुरेंद्र फेरफटका मारायला घराबाहेर पडले असता त्यांच्यासोबत ही भयंकर घटना घडली. फेरफटका मारताना रेल्वे स्थानकाजवळील सीजीएस लेनवर पोहोचल्यावर, पीडित व्यक्तीचा त्याच्यासोबत एका दुसऱ्या एका माणसाशी वाद झाला आणि त्या वादातूनच ही घटना घडली. 

हे वाचलं का?

चालताना धक्का लागला अन् बेदम मारहाण...

मिळालेल्या माहितीनुसार, बाहेर चालत असताना पीडित व्यक्तीचा आरोपीला धक्का लागला आणि यामुळे दोघांमध्ये वाद झाला. दुसरी बाब अशी की, घटनास्थळ रात्रीच्या वेळी निर्जन म्हणजेच सुनसान असतं. त्या ठिकाणी, चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यामुळे, चोरीच्या उद्देशानेच आरोपीने सुरेंद्रसोबत जाणूनबुझून भांडण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

हे ही वाचा: मी थकलोय, मुलांची काळजी घ्या; मतदार याद्यांच्या कामाचा तणाव, BLO ने गळफास घेऊन आयुष्य संपवलं

रिअल इस्टेट एजन्टवर गोळीबार

गंभीररित्या जखमी झाल्याने, पीडित रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. आता, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: संगमनेरमधून काँग्रेसचा 'पंजा' गायब, राज्यभरातून टीकेची झोड, अखेर बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण

तसेच, मुंबई पोलीस गुन्हे शाखेने एका रिअल इस्टेट एजन्टवर गोळीबार केल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून चार लोकांना अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी एका शाळेच्या बाहेर दुपारच्या सुमारास फ्रेडी डी लीमा या तरुणावर तीन जणांकडून गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान, राजेश रमेश चौहान उर्फ दया (42), सुभाष भीकाजी मोहिते (44), मंगेश एकनाथ चौधरी (40) आणि कृष्णा उर्फ रोशन वसंतकुमार सिंह (25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

    follow whatsapp