मुंबई: राहत्या फ्लॅटवरून जोडप्यात वाद! संतापलेल्या पतीने बायकोच्या डोक्यात दगड घातला अन्...

मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात रात्रीच्या सुमारास एका 52 वर्षीय पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती आहे.

पतीने बायकोच्या डोक्यातच दगड घातला अन्...

पतीने बायकोच्या डोक्यातच दगड घातला अन्...

मुंबई तक

• 02:42 PM • 21 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत राहत्या फ्लॅटवरून जोडप्यात वाद!

point

संतापलेल्या पतीने बायकोच्या डोक्यात दगड घातला अन्...

Mumbai Crime: मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी (20 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. एका 52 वर्षीय पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

फ्लॅटवरून पती-पत्नीमध्ये वाद 

पोलिसांनी घटनेतील आरोपी पतीला अटक केली असून सिराज नाईक अशी आरोपीची असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सिराजवर त्याच्या मुमताज नाईक नावाच्या 45 वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. SRA प्रोजेक्टअंतर्गत मिळणाऱ्या फ्लॅटवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादातून, पतीने पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिराज आपली पत्नी आणि तीन मुलांसह मालवणी परिसरात राहत होता. त्याचं राहतं घर हे पुनर्विकासासाठी जाणार होतं. यावरून, सिराज त्याच्या पत्नीला म्हणाला की, जर त्यांनी बिल्डरला 9.70 लाख रुपये दिले तर या योजनेअंतर्गत त्यांना नवा फ्लॅट मिळेल. सिराजला हे पैसे एकट्याने भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने पत्नीला आणि मुलांना यासाठी पैसे देण्यास सांगितलं होतं. मात्र, यासाठी मुमताजने विरोध केला आणि त्यानंतर, त्या दोघांमधील वाद वाढत गेला. 

हे ही वाचा: पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं अन् नंतर, छतावरून खाली ढकललं... पतीच्या जाचामुळे महिलेचा मृत्यू!

दगडाने वार करून पत्नीची हत्या 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री मुमताज झोपण्यासाठी गेली. त्यावेळी, आरोपी पती एक मोठा दगड घेऊन आला आणि त्या दगडाने त्याने त्याच्या पत्नीच्या डोक्यावर वार केला. यामुळे, या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुमताजचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर, आरोपी थेट मालवणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देत सरेंडर केलं. 

हे ही वाचा: नांदेड हादरलं! 7 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात...

त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतलं आणि पत्नीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सध्या, आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का? याचा पोलीस तपास करत आहेत. 

    follow whatsapp