मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, दरवाजा बंद करण्यावरुन वाद अन् भयानक घडलं!

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 03:57 PM)

Mumbai Local Murder Case : अंधेरी ते बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. जखमी तरुणाच्या मदतीच्या रेल्वे प्रशासन धावले. परंतु, रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला होता.

Mumbai Local Murder Case

Mumbai Local Murder Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या,

point

'त्या' कारणावरुन वाद अन्..

Mumbai Local Murder Case : मुंबईतील चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये सोमवारी (दि.23) रात्री एक धक्कादायक घटना घडली. अंधेरी ते बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये झालेल्या वादातून 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मयंक आणि आरोपी हे दोघेही अंधेरी स्थानकातून एकाच फर्स्ट क्लास डब्यात चढले होते. मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : धाराशिव ग्राऊंड रिपोर्ट : टेंडरचे खेळ, निधीचं गणित आणि राजकारणातील 'लक्ष्मीदर्शन'

आरोपीने बोरिवली स्थानकातून पळ काढला 

वाद वाढल्यानंतर आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये घडला. गंभीर जखमी झालेल्या मयंकला मदत मिळण्यापूर्वीच आरोपीने बोरिवली स्थानकात गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वी उडी मारून पळ काढला.

प्रशासन मदतीसाठी धावले, पण तरुणाला मृत्यूने गाठले 

रात्री 11.04 वाजता लोकल बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी मयंकला डब्यातून बाहेर काढून उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आला.

हेही वाचा : 'नार्वेकरांनी आशाताईंच्या नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला, त्यापेक्षा हिब्रूमध्ये... राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट

या प्रकरणाचा तपास सरकारी रेल्वे पोलीस करत आहेत. पश्चिम रेल्वेने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत. तसेच तपासासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.