Mumbai News: दररोज कामानिमित्त लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा स्टेशनदरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे पाच जाणांना आपला जीव गमवावा लागला. विशेषत: मध्य रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
ADVERTISEMENT
प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम
मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनवरील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.
हे ही वाचा: आता गं बया! दोन मुलींचं एकमेकींवर जडलं प्रेम..रुममध्ये नको ते करत होत्या! कुटुंबियांनी पाहताच फरार झाल्या अन्..
ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वाढ
यासोबतच, 2026 मध्ये 15 डब्यांच्या लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. खरंतर, काही वर्षांपूर्वी नऊ डब्यांच्या लोकल 12 डब्यांच्या करण्यात आल्या. त्यानंतर काही लोकलच्या डब्यांची संख्या 15 पर्यंत वाढवण्यात आली. लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये वाढ केल्यामुळे या लोकल चालवण्यासाठी मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली.
हे ही वाचा: आरारारारा! ग्राहकांची दिवाळी संपली..सोन्याचे दर पुन्हा कडाडले, आजचे भाव वाचून सर्वांनाच फुटलाय घाम
स्टेशनवरील गर्दी कमी होणार...
खरंतर, लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या बऱ्याच प्रवाशांना वाढत्या गर्दीमुळे जीव गमवावा लागतो. या समस्येचं गांभीर्य विचारात घेता यावर उपाय म्हणून दरवाजा बंद लोकल आणण्याचं जाहीर केलं होतं. आता रेल्वे प्रशासनाने 15 डब्यांच्या लोकलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. नवीन वर्षात 15 डब्यांच्या आणखी लोकल ट्रेन चालवण्यात येणार असल्यामुळे स्टेशनवरील गर्दी काही प्रमाणात कमी होणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
