Mumbai News: मुंबईतील मेट्रो-4 लाइनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो-4 लाइनचं ट्रायल सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, हे वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. रविवारी (10 ऑगस्ट) ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या 31 व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. वडाळा ते कापूरबावडी यांना जोडणारा कॉरिडॉर मेट्रो-4A पर्यंत वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ही मेट्रो लाईन मीरा-भाईंदर (मेट्रो-10) शी देखील जोडली जात आहे. तसेच, या मार्गावरुन ती मुंबईच्या इतर मेट्रो लाईन्सशी जोडली जाईल. यामुळे महानगर क्षेत्रातील लोकांना सहज आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास करता येईल.
डिसेंबर महिन्यात कार्यान्वित होण्याची शक्यता...
एकनाथ शिंदे यांनी या प्रोजेक्टबद्दल माहिती देताना सांगितलं, "ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो मार्गावर काम सुरू असून यामध्ये मेट्रो-4 सह इंटरचेन्ज स्टेशन्सचा समावेश आहे, जे शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ठाणे आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे." शिंदे यांनी यापूर्वी गायमुख-माजिवाडा विभाग (मेट्रो लाईन-4 भाग आणि 4A) वरील चाचणी वर्षाच्या अखेरीस सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं. याबद्दल विरोधी पक्ष नेते सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं समोर येत आहे. विशेषतः घोडबंदर विभाग आणि मोगरपाडा कारशेडच्या बांधकामातील विलंबावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा: बहिणीकडून राखी बांधली अन् रात्री तिच्यासोबत केलं घाणेरडं कृत्य... एवढ्यावर भागलं नाही म्हणून फाशी...
पंतनगर-घाटकोपर मध्ये किती काम पूर्ण?
MMRDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, कॉरिडोरचं 85 टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच, या आठवड्याच्या अखेरीस पंतनगर-घाटकोपर बस स्थानकावर 58 मीटरचा स्टील स्पॅन बसवण्यात येणार असल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं. डेपोचे काम पूर्ण होण्याची वाट न पाहता चाचणी आणि पूर्व-कार्यरत काम करण्यासाठी मंडाले डेपो (लाइन 2B) मधून लाइन 4 वरील गायमुख आणि कॅडबरी दरम्यानच्या उंच भागात 48 मेट्रो कोच हलवण्याची योजना आहे.
हे ही वाचा: दोन मुलांच्या विधवा आईचा बॉयफ्रेंडसोबत रोमान्स! अचानक मुलाने सगळंच पाहिलं अन् नंतर घडलं...
मनपा आयुक्तांना दिले निर्देश
दरम्यान, शिंदे यांनी गुजरात, नाशिक आणि जेएनपीटी येथून येणारी मालवाहतूक आणि बाहेर जाणारी वाहतूक मुंबई फ्रीवे विस्तार आणि कोस्टल रोडद्वारे वळवून ठाणे रस्त्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपयुक्त योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जाहीर झालेल्या 3,000 कोटी रुपयांच्या बजेटचा वापर ठाण्याची 'तलावांचे शहर' म्हणून ओळख जपण्यासाठी, ग्रीन झोन तयार करण्यासाठी आणि खड्डेमुक्त रस्ते सुनिश्चित करण्यासाठी करण्याचे निर्देश दिले.
ADVERTISEMENT
