मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांनो! आता गर्दीच्या वेळेतच सेंट्रल रेल्वेवर लोकल ट्रेनची संख्या वाढणार, तब्बल 'इतक्या' गाड्या...

मध्य रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी मुख्य मार्गावरील लोकल ट्रेनचा मार्ग मोकळा होईल आणि 10 ते 12 लोकल ट्रेनच्या सेवेत वाढ होणार आहे.

सेंट्रल रेल्वेवर लोकल ट्रेनची संख्या वाढणार

सेंट्रल रेल्वेवर लोकल ट्रेनची संख्या वाढणार

मुंबई तक

• 02:41 PM • 23 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता गर्दीच्या वेळेतच सेंट्रल रेल्वेवर लोकल ट्रेनची संख्या वाढणार

point

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासाजनक बातमी...

Mumbai News: दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जारी होणारं मध्य आणि पश्चिम रेल्वेचं नवं वेळापत्रक यावर्षी डिसेंबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. इन्फ्रास्क्चरच्या कामामुळे रेल्वेचं नवं टाइम टेबल लागू होण्यास वेळ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ऑपरेशन डिपार्टमेंटने रेल्वेच्या नव्या वेळापत्रकासंबंधी बोर्डाकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार, लांब पल्ल्याच्या काही एक्स्प्रेस गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) कडे डायव्हर्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. असं झाल्यास, गर्दीच्या वेळी मुख्य मार्गावरील लोकल ट्रेनचा मार्ग मोकळा होईल आणि यामुळे 10 ते 12 लोकल ट्रेनच्या सेवेत वाढ होणार आहे. 

हे वाचलं का?

खरं तर, एका लोकल ट्रेनमधून जवळपास 2500 लोक प्रवास करतात. अशाप्रकारे, त्यानुसार, जर 10 लोकल ट्रेनची सेवा वाढवली तर भविष्यात अंदाजे 25,000 प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यामुळे, लोकल ट्रेनच्या प्रवाशांची सुद्धा क्षमता वाढेल. 

15 डब्यांच्या लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ

लवकरच, मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ होणार आहे. यामध्ये फास्ट (जलद) आणि स्लो अशा दोन्ही गाड्यांचा समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत मध्य रेल्वेच्या 27 स्थानकांच्या विस्ताराचं काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, जास्त डब्यांच्या ट्रेन चालवणं शक्य होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, सध्या 12 कोच असलेल्या सुमारे 10 गाड्या 15 डब्यांमध्ये अपग्रेड केल्या जातील. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढवली जाईल. या बदलाचा एकूण संपूर्ण फेरीवर काहीच परिणाम होणार नाही.

हे ही वाचा: Govt Job: तरुणांना मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची संधी! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार थेट भरती...

नव्या एसी लोकलचा समावेश 

लवकरच मध्य रेल्वेमध्ये एका नव्या एसी लोकलचा समावेश होणार आहे. ही एसी लोकल जानेवारी प्रवाशांच्या सेवेत येऊ शकते. यावेळी, ही एसी लोकल हार्बर लाइनवर चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. खरं तर, काही वर्षांपूर्वी हार्बर लाइनच्या प्रवाशांनी एसी लोकलला विरोध केला होता. मात्र, गेल्या काही काळापासून या मार्गावर एसी लोकल गाड्यांची मागणी वाढत आहे. यासंदर्भात, डिपार्टमेंटला बरीच पत्रे मिळाली आहेत.

हे ही वाचा: कोल्हापूर : पतीच्या खूनासाठी पत्नीची 5 जणांना सुपारी, बॉडी पोत्यात भरुन नदीत फेकली, पुरावेही साफ पण नंबर प्लेटने गेम

सध्याच्या रेल्वे सेवा

1. सेंट्रल रेल्वेवरील एकूण लोकल सर्व्हिस: 1810 
2. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सर्व्हिस: 1406

    follow whatsapp