शाळेच्या मार्कशीटवर खाडाखोड; बापाने 9 वर्षाच्या चिमुरडीचा मशिनने चिरला गळा

Daund crime : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या रागातून मुलीचा तिच्याच वडिलांनी अमानुषपणे मारहाण केली, नंतर लाकूड कापण्याच्या मशिनने तिच्या गळा चिरला, या घटनेनं दौंड तालुका हादरून गेला आहे.

Daund crime

Daund crime

मुंबई तक

06 May 2026 (अपडेटेड: 06 May 2026, 07:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गुणपत्रिकेवर खाडाखोड

point

नराधम बापाने लाकूड कापण्याच्या मशिनने मुलीचा गळा चिरला

Daund Crime : वसंत जाधव - दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या रागातून मुलीचा तिच्याच वडिलांनी अमानुषपणे मारहाण करत तिची हत्या केली. हत्या केलेल्या वडिलाचे नाव शांताराम दुर्योधन चव्हाण असे आहे. तर मृत विद्यार्थिनीची ओळख अनामिका (वय 9) अशी होती. मुलीची हत्या करून मृतदेह एका पोत्यात भरण्यात आला होता. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना : 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्नावस्थेत फोटो काढून वर्षानुवर्षे अत्याचार, व्हिडिओ कॉल करून नको तेच..

या हत्येनंतर परिसरात खळबळ माजली असून मृतदेह कापडात गुंडाळून नंतर आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची ससून रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. आरोपीसोबत राहत असलेल्या महिलेनं घटना घडल्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : नागपूर : दोघांचा एकाच मुलीवर जीव, भेटायला बोलावले अन्... प्रेमसंबंधाच्या वादातून एकाने दुसऱ्या तरुणाचा केला गेम

गुणपत्रिकेवर खाडाखोड, नराधम बापाने लाकूड कापण्याच्या मशिनने मुलीचा गळा चिरला

घटनेमागील धक्कादायक कारण समोर आलेलं आहे. मृत अनामिका आणि संस्कार या दोघांचा काही दिवसांपूर्वी शाळेचा निकाल लागला होता. त्यामध्ये संस्कारचा पहिला क्रमांक आला होता, तर अनामिकाचा दुसरा क्रमांक आला होता. मात्र, अनामिकाच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड करून पहिला क्रमांक केला आणि संस्कारचा दुसरा क्रमांक केला. मुलांमधील किरकोळ वादामुळे शांताराम चव्हाण यांनी मनात धरला आणि संतापाच्या भरात लाकूड कापण्याच्या कटरने अनामिकाच्या गळा चिरून तिची हत्या केली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.