72 तास मृत्यूशी झुंज, ढिगाऱ्याखालून पत्नीला सेल्फी पाठवला, अन् मिळालं नवजीवन

मुंबई तक

11 Jul 2026 (अपडेटेड: 11 Jul 2026, 05:22 PM)

moshi building collapse survivor vijay sapkal last selfie : मोशी दुर्घटनेला 72 तास उलटले तरी बचावकार्य सुरूच असून विजय सपकाळ यांच्या जिद्दीची कहाणी सर्वांना भावूक करत आहे.

moshi building collapse survivor vijay sapkal last selfie

moshi building collapse survivor vijay sapkal last selfie

Google CTA

बातम्या हायलाइट

point

72 तास मृत्यूशी झुंज

point

ढिगाऱ्याखालून पत्नीला सेल्फीसह मेसेज पाठवला

point

अन् मिळालं नवजीवन

moshi building collapse survivor vijay sapkal last selfie : मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेला 72 तास उलटले असले तरी बचावकार्य अद्याप सुरूच आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अनेक कर्मचारी ढीगाऱ्याखाली आणि इमारतीच्या पिलर्सजवळ अडकले होते. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 16 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून सात जणांचा शोध अद्याप सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दोन जण दिसत असले तरी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एनडीआरएफच्या माहितीनुसार, बचावकार्य आज मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या 'या' कंपनीत भरती सुरु, महिना 1 लाख 20 हजार रुपये पगार!

विजय सपकाळ यांची कहाणी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारी

या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेले विजय सपकाळ यांची कहाणी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे. ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर आपण आता वाचणार नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या पत्नीला सेल्फी पाठवत, "मी इमारतीखाली अडकलो आहे... लवकर ये," असा संदेशही पाठवला होता. जवळपास नऊ तास ते अडकून होते. त्यांच्या पायावर मोठा खांब पडला होता. आजूबाजूला काचेचे तुकडे आणि मलबा पसरला होता. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूमुळे श्वास घेणेही कठीण झाले होते. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. स्वतःसोबत अडकलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आवाज देत त्यांची विचारपूस केली आणि एकमेकांचे मनोबल वाढवत राहिले. 

हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत किती पाणी? पाणीकपात थांबणार का?

...अन् काही क्षणांत संपूर्ण इमारत कचऱ्याखाली गाडली गेली

दुर्घटना घडली तेव्हा विजय सपकाळ यांच्यासह 15 ते 16 कर्मचारी पहिल्या मजल्यावरील कँटीनमध्ये जेवण करत होते. त्याचवेळी कचऱ्याचा प्रचंड ढिगारा इमारतीवर कोसळला आणि काही क्षणांत संपूर्ण इमारत कचऱ्याखाली गाडली गेली. मलब्याखाली अडकलेल्या विजय यांच्या डोळ्यांसमोर पत्नी, मुलगा आणि संपूर्ण कुटुंबाचा चेहरा सतत दिसत होता. आता मृत्यू निश्चित असल्याची भावना त्यांच्या मनात होती. ते सतत देवाचे नाव घेत राहिले. अखेर तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर बचाव पथकाने त्यांना जिवंत बाहेर काढले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते हा जीवदानाचा क्षण देवाचा चमत्कार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या सोबत अडकलेली आणखी एक महिला कर्मचारीही बचावली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून 10 लाख रुपये, महाराष्ट्र शासनाकडून 5 लाख रुपये आणि संबंधित ठेकेदाराकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित इमारत अधिकृत होती की अनधिकृत, याचाही तपास केला जाणार आहे. 72 तास उलटूनही बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांची नजर अजूनही एका आशेवर खिळून आहे की, ढिगाऱ्याखालून त्यांच्या कुटुंबातील माणूस जिवंत बाहेर येईल.