बुधवार पेठेत कारवाई, कथित वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; 14 बांगलादेशी नागरिकांसह 18 जण ताब्यात

मुंबई तक

28 Apr 2026 (अपडेटेड: 28 Apr 2026, 08:19 PM)

Pune crime : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात कथित वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.  या रॅकेटच्या माध्यमातून संघटित रॅकेटचा पर्दाफाश करत 14 बांगलादेशींसह इतर 18 जणांना ताब्यात घेतले.

Pune crime budhwar peth

Pune crime budhwar peth

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्याच्या बुधवार पेठेत मोठी कारवाई

point

रॅकेटचे धागेदोरे कुठे? 

Pune Crime : आदित्य भावार - पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात कथित वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.  या रॅकेटच्या माध्यमातून संघटित रॅकेटचा पर्दाफाश करत 14 बांगलादेशींसह इतर 18 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी  ‘डिस्को’ आणि ‘मॅचबॉक्स’ या इमारतींवर छापेमारी करत कडक कारवाई केली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जुन्नर तालुक्यात दुर्दैवी घटना, शेततळ्यात बुडून दोन चिमुरड्यांचा अंत; ग्रामस्थ हळहळले

पुण्याच्या बुधवार पेठेत मोठी कारवाई

पोलिसांच्या माहितीनुसार, मानवी तिस्करीद्वारे महिलांना आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. अशातच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळ यांच्या माहितीनुसार, बुधवार पेठेत काही इमारतींमध्ये बेकायदेशीरपणे कागदपत्रांचा वापर करत असल्याचे आढळून आले.

रॅकेटचे धागेदोरे कुठे? 

या प्रकरणात यंत्रणांनी सखोल तपास करत बांगलादेशी नागरिकांनी भारतात प्रवेश कसा केला, बनावट कागदपत्र बनवण्यास कोणी मदत केली? याचा अनेक स्तरावरून तपास केला जाणार आहे. शिवाय, या रॅकेटचे धागेदोरे इतर राज्यांशी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करीचे जाळे विनले आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. 

हे ही वाचा : बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? 'त्या' संपूर्ण कुटुंबाचा नेमका कसा झाला अंत?

पोलिसांनी स्पष्ट केलं की, याचा दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांशी थेट संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे. बुधवार पेठ परिसरात अशा स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली आहे.