Pune Crime : ग्रामीण पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत स्टेशन येथे नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकाने विटंबना केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटे साडेचार ते साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यानंतर काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या ठिकाणी मोर्चा काढला. यानंतर आज मशिदीवर दगडफेक झाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूरातील नामांकित शाळेत 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पार्किंगमध्येच...नेमकं काय घडलं?
या घटनेमुळे सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंदू धर्माच्या भावनांना कुठेतरी ठेच पोहोचली आहे. अश्या प्रवृत्तीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निषेध म्हणून यवत गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांनी सर्व गाव बंद ठेऊन जाहीर निषेध केला.
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या घरांवर दगडफेक केली जात आहे. एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव अद्यापही कायमच असल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी जाळपोळ होताना दिसते. घटनेची परिस्थिती लक्षात घेता, पुणे पोलिसांनी विशेष तुकडी या ठिकाणी दाखल केली.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी एकूण घडलेल्या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, यवतमध्ये गेली दोन ते तीन दिवस तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांशी संपर्क साधून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी जमाव जमलेला आहे, त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सध्या घटनास्थळाची परिस्थिती पाहता पोलीस नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : रक्ताळलेला चेहरा अन् कपडे फाटलेली, प्रेयसीची अवस्था पाहून बॉयफ्रेंड...नेमकं काय घडलं?
मतांसाठी काही लोकांना पाठीशी घातलं
संबंधित प्रकरणात यवत ग्रामस्थांनी सांगितलं की, एका तरुणाच्या पोस्टमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आता स्थानिक नेत्यांनी समजूत काढल्यानंतर अनेकजण आपापल्या घरी गेले. या प्रकरणानंतर शांततेचं वातावरण राहील अशी अपेक्षा आहे. बाहेरून आलेल्या लोकांनी हे घडवून आणलेलं आहे. मतांसाठी काही लोकांनी त्यांना आपल्या पाठीशी घालत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
ADVERTISEMENT
