आळंदी : महिलेच्या घरात घुसून सामुहिक अत्याचार, श्याम महाराजावर गंभीर आरोप

Pune Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये श्याम महाराज राठोड यांच्यासह सात जणांवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणावरून राजकीय वादंग निर्माण झालंय.

Pune Crime

Pune Crime

मुंबई तक

14 May 2026 (अपडेटेड: 14 May 2026, 07:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आळंदी : महिलेच्या घरात घुसून सामुहिक अत्याचार

point

श्याम महाराजावर गंभीर आरोप

Pune Crime News : पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. सात जणांनी 7 एप्रिल 2026 रोजी संगनमताने पीडितेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेचे घर त्यांच्या नावावर करण्यासाठी आरोपींनी सतत दबाव टाकला असून, घर विकून पैसे न दिल्यास सतत त्रास देण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : पायाचा अंगठा निळा पडला, अखिलेश यादवांच्या भावाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे!

पीडित महिलेने 24 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्याम महाराज राठोड यांच्यासह अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीत पीडित महिलेने आरोपींवर अत्यंत संतापजनक आणि अमानवीय आरोप केले आहेत. आरोपींनी केवळ 7 एप्रिल रोजीच नव्हे, तर गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी देखील पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या छळवणुकीचा कळस म्हणजे, आरोपींपैकी एकाने पीडितेने बनवलेल्या भाताच्या पातेल्यात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. घटनेच्या काही काळानंतर आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी गेले होते, मात्र तिने दरवाजा न उघडल्याने त्यांनी घराबाहेर उभे राहून तिला शिवीगाळ केली. तसेच पीडितेचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने तिची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली. सध्या दिघी पोलीस या सर्व आरोपांची गांभीर्याने दखल घेत असून प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा : सूनेला तोकड्या कपड्यात रील बनवण्याचं वेड, सासू-सासऱ्यांचं भयंकर पाऊल

राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि शाईफेक प्रकरण

या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाले असून, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विलास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात 20  महाराज हे "खुसखोर" आहेत, असा केल्याने मोठा वाद झाला होता. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती. मात्र, लवांडे यांनी ज्या महाराजांचा उल्लेख केला होता, त्यांपैकी एका महाराजावरच आता सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, ज्या महाराजांच्या नावावरून वाद निर्माण झाला होता, त्यांच्यातीलच एका व्यक्तीवर एवढे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने लवांडे यांच्या जुन्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

या गंभीर गुन्ह्याची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्षावर थेट निशाणा साधला आहे. "महिलांच्या अब्रूवर हात टाकणारे व्यक्ती कधीही वारकरी असू शकत नाहीत," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे की, अशा प्रकारच्या गुंडांना राजाश्रय देऊन त्यांचे संरक्षण करायचे की त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणायचा, हे आता सत्ताधाऱ्यांनीच ठरवावे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संतापाची लाट असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्याम महाराज राठोड यांनी आरोप फेटाळले 

दरम्यान, महिलेने सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर श्याम महाराज राठोड याने प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्याच मी खंडन करतोय.तथ्यहीन आणि व्यर्थ आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करावी ही हात जोडून विनंती आहे. याप्रकरणात माझा सहभाग असल्यास मला फाशीची शिक्षा द्यावी. Fir मध्ये माझं कुठंही नाव नाही. तारीख, वेळ, काळ लिहिलेली नाही. सर्वांचा सीडीआर तपासायला हवा. लवांडे प्रकरणामुळे माझ्यावर आरोप करण्यात आलेत. म्हणून मला दोषी ठरवले जात आहेत. माझ्यावर षड्यंत्र केलं जातं आहे. मी संन्यासी आहे...धर्मकार्य खटकत असल्याने माझ्यावर आरोप आहेत. माझा कुठलाही दोष नाही. काही सुपारीबाझ पत्रकार, धर्मविरोधी लोक असुरी आनंद घेत आहेत. ते माझा फोटो वापरून बातम्या करत आहेत. त्यांना माझा इशारा आहे...त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी करणार आहे. खोट्या बातम्या देणाऱ्यांवर ही कारवाई होईल. माझा न्यायालयावर विश्वास आहे. थोडा वेळ लागेल", अस श्याम महाराज म्हणालाय.