शिक्षक विद्यार्थिनींच्या वॉशरूममध्ये डोकवायचा अन्... ‘त्या’ शाळेतील धक्कादायक प्रकार

Pune Crime News : शिक्षक विद्यार्थीनीच्या बाथरूममध्ये डोकावून पाहायचा अशी प्राथमिक माहिती समोर आली. शिक्षकाच्या या अशा कृतीने गुरू आणि शिष्याच्या नात्याला डाग लागलेला आहे.

pune crime

pune crime

मुंबई तक

25 Jul 2025 (अपडेटेड: 26 Jul 2025, 08:14 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाची विद्यार्थिनींवर वाईट नजर

point

गुरू आणि शिष्याच्या नात्याला डाग

Pune Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये एका इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींवर आणि तिच्या मैत्रिणींवर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षक विद्यार्थीनीच्या बाथरूममध्ये डोकावून पाहायचा अशी प्राथमिक माहिती समोर आली. शिक्षकाच्या या अशा कृतीने गुरू आणि शिष्याच्या नात्याला डाग लागलेला आहे. नराधम शिक्षकाचे नाव संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय 51) असे नाव आहे. तो शिक्षक कृष्णानगर, चिखली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. याला पोलिसांनी अटक केली आहे. 11 जुलै ते 19 जुलै दरम्यान ही घटना घडली आहे. निगडि पोलिसांनी 23 जुलै रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : लग्नात दीराने वहिनीसोबत केला डान्स अन् थेट पोलीसच पोहोचले...नेमकं घडलं काय?

शिक्षकाचं हैवानी कृत्य

संबंधित प्रकरणात घडलेल्या घटनेनुसार, संतोष बेंद्रे हा महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. त्याने पीडित विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत गैरवर्तन केलं आहे. तो विद्यार्थिनींच्या वॉशरूममध्ये डोकावून पाहत होता. शिक्षकाच्या अशा वर्तनामुळे विद्यार्थिनींचं मानसिक संतुलन बिघडू लागलं. या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. 

आरोपी शिक्षकावर भारतीय न्यायसंहिता कलम 74, 78, 115 (2) तसेच पोक्सोच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितलं. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांनी सादर केलेल्या एफआरआयच्या आधारे प्राशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त मोरे यांनी सांगितलं की, मुख्याध्यापकांकडून कामातून निलंबनाची कारवाई केली आहे. 

हेही वाचा : Pune News : पतीनेच बेडरूममध्ये लावले कॅमेरे, पत्नीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड झाले, पतीनं मुद्दम केलं...

जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवल आलेला आहे. आता मुली शाळेतही सुरक्षित नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. 

    follow whatsapp