Pune Accident : पुणे शहरातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीषण अपघात झाला. हा अपघात सोमवारी 1 डिसेंबर रोजी सायंकाळी हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाला होता. या अपघातात तीन सख्ख्या भावंडांना बसने चिरडलं. या घटनेनंतर मद्यधुंद बस चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला असून बसची देखील तोडफोड केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाजप महिला नेत्याच्या नवऱ्याचं 'स्पा'च्या नावनं कांड? दोन फ्लॅटवर न वापरलेले कंडोम जप्त अन् 9 महिला...
या अपघातात अर्चना देवेंद्र प्रसाद (वय 9), सूरज देवेंद्र प्रसाद (वय 6) आणि प्रिया देवेंद्र प्रसाद (वय 16) या भावांडांना बसने चिरडले. तसेच अविनाश हरिदास चव्हाण (वय 26) आणि विमल राजू ओझरकर (वय 40) यांच्यासह इतर काहीजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
धडकी भरवणारा CCTV फुटेज
त्याच क्षणी, एका भरधाव वेगाने येणारी बस अचानकपणे नियंत्रणाबाहेर गेली आणि खांबाला धडकली. या धडकेत वीज गेली आणि सीसीटीव्हीच बंद झाला. बस जेव्हा फुटपाथवर चढली असता, ती जोरदार आदळली. तेव्हा दुचाकीस्वारांनी त्यांना चिरडले आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात तिन्ही भावंडांना आपला जीव गमवावा लागला.
मद्यपान केलेल्या बस चालकाला अटक
बस चालक नागनाथ राजेभाऊ गुज्जर हा दारूच्या नशेत असल्याचे तपासात उघड झाले. प्राथमिक वैद्यकीय चाचण्यांमधून याची पुष्टी झाली. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. तसेच या प्रकरणात बस मालकाचा शोध सुरु आहे. अपघातानंतर संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने वाहतूक काही वेळ ठप्पच होती.
ADVERTISEMENT











