Kalwa Hospital : एका दिवसांत रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितले कारण

विक्रांत चौहान

11 Aug 2023 (अपडेटेड: 11 Aug 2023, 02:40 PM)

ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Thane news : 5 patients died in chhatrapati shivaji maharaj municipal hospital, kalwa.

Thane news : 5 patients died in chhatrapati shivaji maharaj municipal hospital, kalwa.

follow google news

Thane municipal hospital : ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काय चाललंय, असा सवाल उपस्थित झाला आहे. याच कारण म्हणजे या रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. पाचही रुग्णांचा मृत्यू वेळेत उपचार न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. (5 patients died in thane municipal hospital)

हे वाचलं का?

ठाणे शहरातील गोरगरीब रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्णांचे आधारवड म्हणून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पहिले जाते. मात्र, याच रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झालाय. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. मोबाईल चार्जिंगचे शंभर, आयसी बेडचे 200 तर ऑक्सिजन बेडचे 200 मागितले जात असल्याचा गंभीर आरोप देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णांच्या मृत्युबद्दल प्रशासनाने काय सांगितलं?

दरम्यान, आमचा रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली असून, आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे 3 रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते असा खुलासा प्रशासनाने केला आहे.

तसेच पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांनी स्पष्ट केले. यामध्ये एका रुग्णाचा हृद्यविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एका अज्ञात आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील माळगावकर यांनी दिली.

वाचा >> ‘…पण यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले’, राहुल गांधींवर PM मोदींचा घणाघात

या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी व मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील प्रकरणाचा आढावा घेत रुग्णालय प्रशासनातला जाब विचारण्याचा प्रयत्न के.ला त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाला मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तसंच दंगल नियंत्रण पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेल आहे.

    follow whatsapp