कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जण ठार, ढिगाऱ्याखाली दबलेले अनेकजण गंभीर, कशी घडली घटना?

Kalyan Building Collapse: अपघातानंतर या परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं.

Mumbai Tak

मुंबई तक

21 May 2025 (अपडेटेड: 21 May 2025, 05:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

point

कल्याणमध्ये 35 वर्ष जुनी इमारत कोसळली

मुंबई आणि उपनगरांमध्ये काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसात अनेक ठिकाणी रस्ते, नाले ओसंडून वाहिले. तर दुसरीकडे मात्र एक दुर्दैवी एक घटनाही घडली. कल्याण पूर्वमधील मंगलराघो नगर भागात मोठा अपघात घडला.  सप्तशृंगी नावाच्या 35 वर्षीय जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळल्यानं या घटने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> कोकणात मेघगर्जना, विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा..तर मुंबईत पाऊस घालणार धुमाकूळ? जाणून घ्या आजचं हवामान

अपघातानंतर या परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. बचावकार्य जवळपास चार तास चाललं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्येही काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. 

मृतांमध्ये कुणाकुणाची नावं?

मृतांमध्ये , नमस्वी शेलार (1.5 वर्ष), व्यंकट चव्हाण (42), प्रमिला साहू (58), सुनीता साहू (37), सुजाता पडी (32) आणि  सुशीला गुजर (78) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये अरुणा गिरनारायण (48), शर्वील शेलार (04), विनायक पाधी (45), यश क्षीरसागर (13), निखिल खरात (27) आणि श्रद्धा साहू (14) यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल 

हे ही वाचा >> धो धो...! पुण्यात मुसळधार पावसामुळे भलंमोठं होर्डिंग कोसळलं, घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील दुरुस्तीचं काम नुकतंच सुरू झालं होतं. अपघातानंतर अग्निशमन दल, टीडीआरएफ, पोलिस आणि सामाजिक संस्थांनी मदत कार्यात सक्रिय भूमिका बजावली. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत चौकशीचे आदेश दिले आहेत.

    follow whatsapp