BJP Maharashtra : भाजपचे नेते भिडले, पक्षाच्या विधानसभा प्रमुखालाच मारले; व्हिडिओ व्हायरल

प्रशांत गोमाणे

04 Dec 2023 (अपडेटेड: 04 Dec 2023, 06:46 AM)

पत्रकार परिषद उपस्थित असलेल्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मेहकर विधानसभा प्रमुख यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या सोबत लोखंडी रॉडने देखील हल्ला केला आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

assembly election result bjp two group fight together video viral mehkar buldhana news chandrashekjhar bawankule

assembly election result bjp two group fight together video viral mehkar buldhana news chandrashekjhar bawankule

follow google news

Buldhana Mehkar BJP Worker Two Group Fight Together : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपची सत्ता आली आहे, तर तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपच्या या तीन राज्यातील विजयानंतर कार्यकर्त्याकडून जल्लोष सुरु आहे. हा जल्लोष सुरू असताना तिकडे बुलढाण्यात  (Buldhana) भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या (BJP Worker) दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. यामध्ये भाजपच्या विधानसभा प्रमुखाला बेदल चोप दिला. या राड्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल घेऊन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी 6 पदाधिकाऱ्यांनी 6 वर्षासाठी निलंबित केले आहे. (assembly election result bjp two group fight together video viral mehkar buldhana news Chandrashekhar bawankule)

हे वाचलं का?

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण राज्याची मतमोजणी रविवारी पार पडली. या मतमोजणीत भाजपने तीन राज्य जिंकली. भाजपने या तीन राज्यात विजय मिळवल्यानंतर देशातील अनेक राज्यात जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्रातील बुलढाण्यातही असा जल्लोष सूरू होता. या जल्लोषा दरम्यान भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचा गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. या राड्यात दोन गट आपआपसात भिडल्याचे पाहायला मिळाले.

हे ही वाचा : Cyclone Michaung Updates : मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर, महाराष्ट्राला किती धोका?

भाजपच्या तीन राज्यातील विजयानंतर बुलढाण्याच्या मेहकर शहरातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरातील विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला अनेक पत्रकार येणे बाकी असल्याने पत्रकार परिषदेची सुरूवात झाली नव्हती. या दरम्यानच भाजपचे इतर काही पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पत्रकार परिषद उपस्थित असलेल्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मेहकर विधानसभा प्रमुख यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या सोबत लोखंडी रॉडने देखील हल्ला केला आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा : Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना PM मोदींबद्दल असं काय बोलली की लोक करताहेत ट्रोल?

याप्रकरणी मेहकरच्या भाजप विधानसभा प्रमुखांनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतची तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी 23 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास केला आहे. तसेच या घटनेची दखल महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. बावनकुळे यांच्या आदेशानुसार बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी मेहकरच्या 6 कार्यकर्त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे.

दरम्यान एकीकडे भाजपच्या विजयाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांच्या राड्याची चर्चा आहे.

    follow whatsapp