Viral Video: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! गणपतीपुळेतील ‘ही’ लाट ‘बिपरजॉय’मुळे?

Biparjoy Cyclone effect: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर एका अजस्त्र लाटेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जाणून घ्या या लाटेमुळे नेमकं किनाऱ्यावर काय घडलं.

biparjoy cyclone konkan ratnagiri ganpatipule sea wave high tide Terrible incident rain monsoon

biparjoy cyclone konkan ratnagiri ganpatipule sea wave high tide Terrible incident rain monsoon

मुंबई तक

12 Jun 2023 (अपडेटेड: 12 Jun 2023, 08:31 AM)

follow google news
Biparjoy Cyclone: गोकूळ कांबळे, रत्नागिरी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे (Ganpatipule) येथील समुद्रकिनारी काल (11 जून) एक भयंकर घटना घडली. संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एक महाभंयकर लाट (Wave) किनाऱ्यावर धडकली. ज्यामध्ये किनाऱ्यावरील सर्व दुकानांची वाताहात झाली. सगळ्यात भयंकर बाब म्हणजे जेव्हा ही अजस्त्र लाट आली तेव्हा किनाऱ्यावर हजारो लोक समुद्र स्नानाचा आनंद घेत होते. जे एका क्षणात बाहेर फेकले गेले. सुदैवाने या लाटेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (biparjoy cyclone konkan ratnagiri ganpatipule sea wave high tide Terrible incident rain monsoon)

नेमकं काय घडलं गणपतीपुळ्यात?

गणपतीपुळे येथील समुद्र किनारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वेगाने एक लाट आली. त्यापाठोपाठ दुसरी अजस्त्र लाट वेगाने किनार्‍यावर धडकली. सुरवातीला आनंद वाटणार्‍या पर्यटकांच्या मनात मात्र यानंतर खूपच धडकी भरली.
किनार्‍यावरील कट्ट्यावर आनंद घेणार्‍या पर्यटकांचीही यावेळी तारांबळ उडाली. यावेळी वाळूमधून धावताना काही पर्यटकांच्या पायाला दुखापत झाली तर लाटेच्या वेगाने धक्क्यावर आपटलेल्या पर्यटकांनाही दुखापत झाली. त्यातील चार जणांना उपचारासाठी जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

हे वाचलं का?
    follow whatsapp